Share

बाळा भेगडेंचा युवकांसाठी नवीन उपक्रम, ‘Coffee with Youth’ या कार्यक्रमातून साधणार संवाद

Published On: 

🕒 1 min read

तळेगाव दाभाडे : आपला देश जगात सगळ्यात तरुण देश म्हणून ओळखला जातो. कारण इतर देशांच्या तुलेनेने भारतात असलेल्या तरुणांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे जगात भारताला तरुणांचा देश म्हणून ओळखले जाते. त्यामुळे देशाचे भवितव्य हे तरुणांच्या हातात असल्याने तरुणांना देशाच्या लोकशाही विषयी आणि त्या लोकशाहीप्रति असलेले सगळ्यात महत्वाचे असलेले ‘मतदान’ हे कर्तव्य समजावून सांगण्यासाठी मावळचे विद्यमान आमदार आणि राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी आपल्या मतदारसंघात ‘युवासंवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. भाजपचे युवा मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांशी संवाद साधणार आहेत.

दिवसेंदिवस देशातील आणि राज्यातील तरुण वर्ग हा मतदान आणि निवडणुकांप्रति उदास होत असल्याच दिसत आहे. त्यामुळे काही मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घसरताना दिसते. आपल्या देशातील युवकांना मतदानाचे महत्त्व समजणे व समजावणे हे भविष्याच्या दृष्टीने फारच महत्वाचे आहे. त्यामुळे बाळा भेगडे यांनी आपल्या मतदारसंघात भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र यांच्या वतीने ‘Coffee with Youth – युवा संवाद’ हा संवादात्मक कार्यक्रम आयोजित केला आहे.

आज दुपारी ४ वाजता तळेगाव दाभाडे येथील वैशाली मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष- भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष आणि आ. योगेश टिळेकर हे देखील उपस्थित असणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1178569992805081089?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1178566161698443264?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1178565928163790848?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!