मुंबई : गेले काही दिवस राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. राजकीय घमासानातून अनेक वेळा वाद पराकोटीच्या तणावावर जाऊन हिंसेपर्यंत गेल्याच्या अनेक घटना आहेत. काल माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी मारहाण केल्याची धक्का दायक घटना उघडकीस आली आहे. यानंतर अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांना अटक करण्यात आली होती. यामध्ये शिवसेना शाखाप्रमुख कमलेश कदम याच्यासह 6 जणांचा समावेश आहे.
या शिवसैनिकांना जामीन मिळाल्याचे वृत्त आता समोर येत आहे. कमलेश चंद्रकांत कदम, संजय शांताराम मांजरे, राकेश राजाराम बेळणेकर, प्रताप मोतीरामजी सुंद वेरा, सुनील विष्णू देसाई आणि राकेश कृष्णा मुळीक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांदिवलीतील निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी मारहाण केली होती. यामध्ये त्यांच्या डोळ्याला देखील दुखापत झाली होती. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारवर टीका केली होती.
काय आहे हे प्रकरण?
निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांचे फक्त व्यंगचित्र व्हाट्सअप वरुन फॉरवर्ड केलं म्हणून शिवसेनेच्या दोन शाखाप्रमुख व अन्य कार्यकर्त्यांनी त्यांना शारीरिक इजा केली. यामध्ये त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच त्यांना मोठ्या प्रमाणावर जखमा झाल्या आहेत. यावरून आता वादंग पेटलं आहे.
महत्वाच्या बातम्या:-
- मातोश्रीवर धमकीचे फोन करणारा अटकेत
- एका चित्रपटाने कंगना झाशीची राणी तर मग विवेक ओबेरॉय हे मोदी आहेत…
- सहा कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याने छगन भुजबळ होम क्वारंटाईन
- वर्धा वासियांनी अनुभवली अवघ्या 15 वर्षांच्या निकेतनची अनोखी सफारी
- नव्या दमाच्या हाय कमांडच्या दृष्टिकोनातून उपयोगिता मूल्य संपल्याने “सुशील पर्व” अस्त होण्याच्या मार्गावर…
- भारताची ताकात वाढणार, आणखी 5 राफेल ताफ्यात शामिल होणार


