🕒 1 min read
मुंबई : मातोश्री उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीना अटक करण्यात आली आहे .गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धमकीचा फोन आला होता त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार , गृहमंत्री अनिल देशमुख यांना देखील फोन आले होते अखेर त्या आरोपीना कोलकाताहूनअटक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे
एनकाऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांनी मोठी कारवाई केली आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना यांना एका अज्ञात नंबरहून धमकीचे फोउ न आले असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली होती. इतंकच नाही तर खुद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन आले. देशमुख यांनी कंगना रणौतवर टिप्पणी केल्यावर हे फोन आले असल्याचे म्हटले होतं. या फोन प्रकरणाची चौकशी सुरक्ष यंत्रणा करत होती.
ज्यांना धमकीचे फोन आले आहेत. त्यांची क्राईम विभागाच्या माध्यमातून चौकशी करण्यात आली माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करताना एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांनी आरोपींचा शोध लावत त्यांना कोलकाताहून ताब्यात घेण्यात आले आहे. तर आरोपींची पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
महत्वाच्या बातम्या
एका चित्रपटाने कंगना झाशीची राणी तर मग विवेक ओबेरॉय हे मोदी आहेत…
सहा कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याने छगन भुजबळ होम क्वारंटाईन
शिवसेना गुंडांचाच पक्ष ; काँग्रेस नेता भडकला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
