Share

एका चित्रपटाने कंगना झाशीची राणी तर मग विवेक ओबेरॉय हे मोदी आहेत…

Published On: 

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत विरुद्ध शिवसेना वाद गेले काही दिवसात प्रचंड टोकाला गेलेला दिसून आला. यानंतर, महापालिकेने कंगनाच्या अनधिकृत कार्यालयावर कारवाई करत तोडकाम केले. तर, ही कारवाई कंगनाने सुशांत सिंह राजपूत प्रकरणी मुंबई पोलीस व व्यवस्थेवर आवाज उठवल्यानंतर राजकीय सुडबुद्धीने केल्याचा आरोप कंगना समर्थकांनी केला होता.

तर कंगना समर्थकांनी तिला ‘झाशीच्या राणी लक्ष्मीबाई ‘ यांची उपाधी देखील दिली आहे. कंगनाने राणी लक्ष्मीबाई यांच्यावर आधारित मणिकर्णिका या चित्रपटात राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका साकारली होती. त्यामुळेच बॉलिवूडमधील नेपोटीजम विरोधात उठवलेले आवाज ते शिवसेनेसोबत सुरु असलेल्या संघर्षामुळे तिला थेट राणी लक्ष्मीबाई असे संबोधले जाऊ लागले आहे.

यावरून आता प्रसिद्ध अभिनेता प्रकाश राज याने एक फोटो ट्विट केला असून #justasking अशी पोस्ट केली आहे. या फोटोमध्ये “जर एका चित्रपटाने कंगनाला राणी लक्ष्मीबाई झाल्याचे वाटत असेल तर दिपिका पद्मावती आहे, हृतिक अकबर, शाहरुख खान अशोका, अजय भगतसिंग, अमीर मंगल पांडे आणि विवेक मोदी जी आहे” असा उपरोधिक टोला त्यांनी या ट्विटमधून प्रकाश राज यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या:-

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!