Share

उत्तराखंडमध्ये बद्रीनाथ मंदिरात दीपावली उत्सव; झेंडूच्या फुलांनी सजवले बद्रीनाथ मंदिर…

Published On: 

चमोली – कोरोनामुळे देशातील धार्मिक स्थळे आहेत. भाविकांना दर्शनासाठी ही मंदिर उघडण्यात आली नसली तरीदेखील देवतांचे धार्मिक विधी हे नित्य नियमाने पार पाडले जात आहेत. तर सध्या दिवाळीच्या दिवसांमध्ये उत्तराखंडमधील बद्रीनाथ मंदिर आला झेंडूच्या फुलांची सजावट करण्यात आली आहे. यावर्षी 19 नोव्हेंबरला बद्रिनाथ मंदिराचे दरवाजे बंद होत आहेत. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे हिवाळी हंगामामुळे भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात येते.

बद्रीनाथ मंदिर हे देशाच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनाथ गावामधील एक विष्णूचे हिंदू मंदिर आहे. हिंदू धर्मामधील सर्वात मानाच्या पवित्र चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी बद्रीनाथ मंदिर एक आहे. समुद्रसपाटीपासून 3,133 मी (10,279 फूट) उंचीवर वसले आहे. उत्तराखंडच्या चमोली जिह्यात अलकनंदा नदीच्या काठावर असलेले हे मंदिर केवळ काही महिने दर्शनासाठी खुले असते.

दिवे आणि रंगीबेरंगी रोषणाईने सजलेल्या सुवर्णमंदिराचा दिवाळी सणात वेगळाच थाट पाहायला मिळतो. बद्रीनाथ धामाचे विशाल मंदिर भव्य पद्धतीने सजवले आहे. दरवर्षी दीपावलीच्या उत्सवात मंदिर झेंडूच्या फुलांनी सजविले जाते. मंदिर परिसरातील माता लक्ष्मी मंदिरात दीपावलीच्या उत्सवावर विशेष पूजा केली जाते. दीपोत्सवही बद्रीनाथ मंदिरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यावर्षी 19 नोव्हेंबरला बद्रिनाथ मंदिराचे दरवाजे बंद होत आहेत.

12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे हिवाळ्यात भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात येतात. आद्य शंकराचार्य यांनी 9व्या शतकात बद्रीनाथची पुनर्स्थापना केली. बद्रीनाथ हे हिंदू धर्मामधील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते चार धाम पैकी आहे. येथील बद्रीनाथ मंदिराला दरवर्षी सुमारे लाख भाविक भेट देतात.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!