मुंबई : बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान गुरुवारी मलबार हिलवर भलत्याच घरात गेला. चुकीच्या ठिकाणी आलोय, हे लक्षात आल्यानंतर त्याने सर्वांना नमस्कार केला. त्याला ज्या घरात जायचे होते त्याचा पत्ता विचारून घेतला आणि तो त्याला हव्या त्या घरात शांतपणे निघून गेला. बॉलीवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्ट कडून एवढी मोठी चूक होणं हे सगळ्यानाच आश्चर्य करण्यासारखं आहे.
त्याच्या ‘पिके’ चित्रपटातील ‘ये रॉंग नंबर हैं’ हा डायलॉग गाजला होता. पण खुद्द आमिरच्याच या ‘रॉंग नंबर’ची नंतर चर्चा रंगली. गुरूवारी सकाळी आमिर खान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मलबार हिलवरील त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेटीसाठी जाणार होता परंतु आमिरचा रॉंग नंबर लागला आणि आमिर जाऊन पोहचला अशोक चव्हाणांच्या घरी.
ताफ्यातील पहिल्या वाहनातून खुद्द आमिर खान उतरला व तो घराच्या थेट मुख्य प्रवेशद्वाराबाहेरील खुर्चीवर बसून बुटही काढू लागल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यावेळी अशोक चव्हाण बंगल्यावर उपस्थित नव्हते. शिवाय आमिर येणार अशी कोणतीही पूर्वसूचना नसल्यामुळे सारेच कर्मचारी विचारात पडले. शेवटी चव्हाण यांचे माध्यम समन्वयक अभिजित देशमुख यांनी आमिर यांचे स्वागत केले.
आपण अशोक चव्हाण यांना भेटायला आलात का? अशी विचारणा केली. त्यावेळी आमिरच्या चेहऱ्यावरही आश्चर्याचे भाव उमटले. त्याने लगेच आपण फडणवीस यांच्या भेटीसाठी आल्याचे सांगितले. परंतु, हे निवासस्थान फडणविसांचे नसून, चव्हाणांचे असल्याचे कळाल्यावर आमिर खानने विनम्र शैलीत अशोक चव्हाण यांची चौकशी केली. ते घरी नसल्याने त्यांना नमस्कार कळवण्यास सांगितले. त्यानंतर पुन्हा बूट घातले व सगळ्यांना हात दाखवत चव्हाण यांचे निवासस्थान सोडले.
दरम्यान, आमिर खानने लाल सिंग या सिनेमाची शूटिंग २०१९ मध्ये सुरु केली होती, अमीर खान नेहमीच वेगळी भूमिका साकारताना दिसत असतो आणि आपल्या वेगळ्या अंदाजामुळे बॉलीवूड चा परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. ‘लाला सिंग’ या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. लवकरच आमिरचा हा चित्रपट पेक्षकांच्या भेटीला येणार.
महत्वाच्या बातम्या
- बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर; संजय राऊत सोमय्यांवर भडकले
- सोनू सूद लिहितोय पुस्तक, “मी तारणहार नाही”; पुस्तकाचं कव्हर पेज व्हायरल…
- ‘भाजयुमो’ ची महत्वाची तिनही पदे नेत्यांच्या पुत्रांना; कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या का?
- ग्रामीण भागातील रस्त्यांची वाळू वाहतुकीमुळे दुरवस्था; पोपट पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र!
- शेतकरी विरोधी धोरणे रद्द करावीत; बलिप्रतिपदा दिनी हजारो शेतकरी पंतप्रधानांना पत्र पाठविणार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
