Share

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीला संभाजीनगरवर शिक्कामोर्तब कराच! खैरेंची मागणी

Published On: 

औरंगाबाद : महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने व राष्ट्रवादी काँग्रेसने औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर करण्यास विरोध असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेची कोंडी झाल्याचं दिसून आलं. नामांतराबाबत भाजपसह मनसेने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेनं संभाजीनगर असं नामकरण करून हिंदुत्व सिद्ध करावं असं आव्हानच देण्यात आलं आहे.

काँग्रेसने किमान समान कार्यक्रमाची आठवण करून देत नामांतराला तीव्र विरोध केला आहे. तर, दुसरीकडं CMO अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाच्या ट्विटर अकाउंटद्वारे शासन निर्णय वा इतर माहिती देताना औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आगपाखड केली होती.

या सर्वावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल भाष्य करत औरंगजेब हा सेक्युलर नव्हता त्यामुळे अजेंड्याचा प्रश्न येत नाही असं म्हणत नामकरणावर ठाम असल्याची भूमिका पुन्हा उघड केली होती. यासर्वावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आनंद व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरबाबत ठाम भूमिका घेतल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

तर, औरंगाबादचा संभाजीनगर असा पहिल्यांदा उल्लेख करणाऱ्या दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी नामकरणावर शिक्कामोर्तब करावा अशी मागणी देखील केली आहे. ‘औरंगाबाचं संभाजीनगर असं नामकरण शिवसेनाप्रमुखांनी केलं होतं. त्यामुळे त्यांच्या जयंतीदिनी म्हणजेच २३ जानेवारी रोजी संभाजीनगर या नामकरणावर शिक्कामोर्तब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करावा. यासंदर्भात मी त्यांना प्रत्येक्ष देखील भेटणार आहे’, असं खैरे म्हणाले आहेत. यासंदर्भात त्यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!