ठाणे:- येत्या काही दिवसांत राज्यातील 5 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर होणार आहेत. यामध्ये नवी मुंबई, औरंगाबाद, कल्याण डोंबिवली, वसई विरार आणि कोल्हापूर महापालिकेची निवडणूक होत आहे. त्यासाठी भाजपने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, आतापर्यंत युतीमध्ये लढल्यामुळे पालिका निवडणुकांमध्ये नेमही शिवसेनेचा महापौर झाला. यापुढे शिवसेना आणि भाजप वेगळी निवडणूक लढणार आहेत. यावेळी राज्यातील सर्व महापालिकांवर भाजपचाच महापौर निवडून येणार, असा विश्वास भाजप नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केला. ते ठाण्यात कोपरी प्रभागात देवीचे दर्शन घेण्यासाठी आले असताना ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.
दरम्यान, यावेळी आशिष शेलार यांनी भंडारा येथील घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचे म्हटले आहे. राज्य सरकारच्या सर्व हॉस्पिटल्समध्ये दिरंगाई आणि बेपरवाई होत, असे म्हणत या दुर्दैवी घटनेची चौकशी 7 दिवसांत करण्याची मागणी शेलार यांनी केली. तसेच 7 दिवसांत जे दोषी आहेत त्यांना कडक शासन व्हावे असे सुद्धा शेलार म्हणाले.