औरंगाबाद : अनेक शाळांनी शुल्क व इतर कारणे देत विद्यार्थ्यांचे क्लासेस आणि शाळेत येने बंद केले आहे. अनेक शाळा विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवत आहे अशा शाळांवर कारवाई करा, असे आदेश शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले.
जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या कडू यांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसह खुलताबाद येथील नंद्राबादच्या शाळेला भेट दिली. या शाळेत 5 वी ते 7 वीचे 33 पैकी 23 विद्यार्थी हजर होते. ‘तुम्हाला काय शिकवले?’ असा प्रश्न मंत्र्यांनी केला असता विद्यार्थ्यांनी ‘असे जगावे’ ही कविता म्हणून दाखवली.
आयुष्यात कितीही संकटे आली तरी न घाबरता तोंड दिले पाहिजे, असा संदेश यातून मिळतो, असे विद्यार्थी सुमीत नानासाहेब बोडखे याने सांगितले. त्यावर कडू यांनी त्यास बक्षीस दिले. मुलांना मोकळे बोलू द्या, हसत खेळत शिक्षणाचा आनंद घेऊ द्या, अशा सूचना त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या.
महत्वाच्या बातम्या
- ‘महाविकास आघाडी सरकारचं काम अतिशय निर्लज्जपणे आणि निर्ढावलेपणाने सुरु’
- कृषी कायद्यांविरोधात जिल्हाभरात शेतकरी आक्रमक, ठिकठिकाणी रास्ता रोको
- पैठणगेटवर डाव्या संघटनांचा कृषी कायद्यांविरोधात रास्ता रोको
- ‘सोडा गं बाई याला सोडा, कोरोनाला धराया जातोय येडा’
- जाणून घ्या कृषी कायद्यांच्या विरोधातील ‘चक्का जाम’ आंदोलनाला राज्यात कसा मिळाला प्रतिसाद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
