🕒 1 min read
अमरावती : केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांना देशभरातील शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे. हे कृषी कायदे रद्द करण्यात यावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. याविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाणाचे शेतकरी आठवडाभरापासून आंदोलन करत आहेत.केंद्राने कृषी कायदे लागू करण्याआधी शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं नाही. केंद्र सरकारने हे कायदे लादले आहेत, असा आरोप शेकऱ्यांकडून केला जातोय.
विज्ञान भवन येथे शेतकरी प्रतिनिधीमंडळ आणि कृषिमंत्री यांच्यात चर्चेनंतरही तोडगा निघत नसल्याचं दिसत असल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. शेतकऱ्यांनी येत्या ८ डिसेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे.दरम्यान, या आंदोलनाला राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही पाठिंबा दिला आहे.
चलो दिल्ली,
गुरूकूंज मोझरी येथुन हजारो दुचाकी,चारचारी,ट्रॅक्टरसह शेतकरी दिल्ली कडे रवाना.. pic.twitter.com/ApxL1fp5Rs— BACCHU KADU (@RealBacchuKadu) December 4, 2020
विशेष म्हणजे पंजाब, हरियाणाच्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू दुचाकीद्वारे थेट दिल्लीकडे रवाना झाले आहेत. ते अमरावतीतील गुरुकुंज मोझरी येथून शेतकऱ्यांसह दुचाकी, ट्रॅक्टर आणि ट्रकसह दिल्लीकडे रवाना झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘कुठेतरी अंतःकरणात लाज नावाची गोष्ट असते, बघा काही शिल्लक राहिली आहे का’; राणेंचा दादांना टोला
- येडीयुरप्पांच्या ‘मराठा विकास प्राधिकरण’ स्थापनेविरोधात कन्नड संघटनांकडून कर्नाटक बंद !
- दोन दिवसांचं अधिवेशन : कोरोनाचं कारण सांगून सरकार वेळकाढूपणा करत आहे; शिरोळेंचा आरोप
- ‘हे हिंदू गद्दार आहेत’; युवराजच्या वडिलांची शेतकरी आंदोलनामध्ये वादग्रस्त वक्तव्ये
- तृप्ती देसाईंनी शिर्डीत स्टंटबाजी केल्यास काळे फासणार; शिवसेना महिला आघाडी आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
