Share

बाबा संतोकसिंघ खून प्रकरण; दोन आरोपी चकमकीत ठार

Published On: 

नांदेड: शहरात झालेल्या खुनाचा छडा लावण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला करण्यात आला. झालेल्या हल्ल्याला प्रतिउत्तर देत दोन आरोपीना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. नगीनाघाट भागातील आरलादासिंघ व परलादासिंघ यांचे शहीद स्थानाजवळ सेवादार संतोकसिंघ मोहनसिंघ नेहंग बाबाजी यांचा पंजाब येथून आलेल्या गुरदेवसिंघ खालसा व महेताबसिंघ उर्फ नरेंद्रसिंघ खंडेवाला बाबा यांनी जुन्या भांडणावरुन ११ मार्च २०२१ रोजी खून केला. यातील दोन्ही आरोपी पंजाबला पळून गेले होते. हे दोघे २२ मार्च २०२१ रोजी पंजाब पोलीसांच्या चकमकीत ठार झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

गुरदेवसिंघ खालसा व महेताबसिंघ ऊर्फ नरेंद्रसिंघ खंडेवाला बाबा यांनी ११ मार्च रोजी शहरातील नगीना घाट भागात सेवादार संतोकसिंघ माहनसिंघ नेहंग यांचा जुन्या भांडणाच्या कारणावरुन तीक्ष्ण हत्याराने खून केला होता. या प्रकरणी पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या आदेशानुसार स्थागुशा व वजिराबाद पोलीस ठाण्याची पथके या आरोपीच्या मागावर होते.

दरम्यान २१ मार्च २०२१ रोजी पंजाब राज्यातील जिल्हा तरणतारण अंतर्गत पोलीस ठाणे भिखीविंड अंतर्गत असलेल्या पटरी डरेन, रखबासिंघपुरा हद्दीत दुपारी २.३० ते ३.३० च्या दरम्यान नांदेड येथील वजिराबाद पोलीस ठाण्यात ८४/२१ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील फरार आरोपींची ओळख पटली. भिखीविंडचे उपाधीक्षक राजबीरसिंघ यांनी पोलीस पथकासह दोन्ही आरोपीस पकडण्यासाठी गेले असताना त्यांनी हातातील खंडा (मोठी तलवार) दोन्ही हाताने फिरवत पंजाब पोलिसांवर हल्ला केला. यात पोलीस निरीक्षक बळविंदरसिंग व पोलीस उपनिरीक्षक नरेंद्रसिंघ गंभीर जखमी झाले.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!