🕒 1 min read
मुंबई : रायपूर येथे शनिवार, 13 मार्च रोजी दक्षिण आफ्रिका लेजेंड्स संघाविरुद्ध इंडिया लेजेंड्सने मोठा विजय मिळविला. सचिन तेंडुलकरचे अर्धशतक आणि युवराज सिंहच्या वादळी खेळीच्या जोरावर इंडिया लेजेंड्सने 56 धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयासह इंडिया लिजेंड्सने स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चित केला आहे.
अष्टपैलू कामगिरी करणारा युवराज सामनावीरचा मानकरी ठरला. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज 2020/21 च्या या 13 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज कर्णधार जॉन्टी रोड्सने नाणेफेक जिंकल्यानंतर पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण या स्पर्धेच्या इतिहासात 200+ धावा करणारा भारत लेजेंड पहिला संघ बनला आणि निर्धारित 20 ओव्हरमध्ये 204/3 धावसंख्या गाठली.
सामन्यादरम्यान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा खेळपट्टीवर असणारा वावर म्हणजे क्रीडारसिकांसाठी एक पर्वणीच. तो आला… त्याने पाहिलं आणि त्याने जिंकलं अशीच काहीशी कामगिरी सचिननं सध्या सुरु असणाऱ्या road safety world series मालिकेमध्ये केली. साऊख आफ्रिका लेजेंड्स अर्थात दक्षिण आफ्रिका संघातील खेळाडूंच्या गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाला भेदत सचिन तेंडुलकरनं इंडिया लेजेंड्स संघाच्या वतीनं दमदार फलंदाजी केल्याचं पाहायला मिळालं.
क्रिकेटच्या मैदानात ज्या शॉट्ससाठी सचिन ओळखला जातो, असेच काहीसे शॉट्स या सामन्याच्या निमित्तानं क्रीडारसिकांना पाहता आलं. अवघ्या 30 चेंडूंमध्ये सचिननं अर्धशतकी खेळी पूर्ण केली. तर, एकूण 37 चेंडूंमध्ये त्यानं 60 धावा केल्या.
सचिनची ही तुफानी कामगिरी पाहून समालोचकांचा उत्साहसुद्धा गगनात मावेनासा झाला होता. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूचा तोच गाजलेला फॉर्म पुन्हा पाहायला मिळाल्यामुळं देव कधीच संन्यास घेत नसतो अशा शब्दांत समालोचकांनी सचिनची प्रशंसा केली.
महत्त्वाच्या बातम्या
- आलिया भट्टची रणबीर कपुरच्या आठवणीत भावनिक पोस्ट
- ‘एमपीएससी परिक्षा २१ मार्च रोजी, सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा’
- नागरी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याकडून पाहणी
- शाळेच्या अनुदानासाठी १४० कोटीच्या निधीस मंजुरी : वर्षा गायकवाड
- महिलांचा आर्थिकस्तर उंचाविण्याचा जीवनज्योती अभियानातून प्रयत्न-मंगेश गोंदावले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

