Share

उत्तराखंड पोलिसांनी कोहलीबाबतचे ‘ते’ ट्विट केले डिलीट

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद : कसोटी मालिकेत इंग्लंड संघावर दणदणीत विजय मिळाल्यानंतर इंग्लंड मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. अवघ्या १२५ धावांचे माफक अव्हान इंग्लंड संघाने २ गडी गमावून लक्ष्य गाठल. सोळाव्या षटकातच इंग्लंडने विजयी लक्ष्य गाठलं.

भारताची सुरुवात ही अडखळत झाल्याचं दिसून आलं. सलामीवीर के एल राहुल अवघी एक धाव करून माघारी परतला. जोफ्रा आर्चर च्या गोलंदाजीवेळी इन्साईड एज लागून बॉल स्टम्पवर आदळल्याने के एल राहुल बाद झाला. तर, यानंतर लगेचच कर्णधार विराट कोहली शून्यावरच माघारी परतला आहे. आदिल रशीदच्या गोलंदाजीवर विराट झेलबाद झाला. सामन्यात अपयशी ठरल्यानंतर. उत्तराखंड पोलिसांनी कोहलीला ट्रोल केले होते.

उत्तराखंड पोलिसांनी कोहलीचे उदाहरण देत नागरिकांना ड्रायविंगबाबत जागरूक करण्याचा प्रयत्न केला होता. ‘केवळ हेल्मेट घालणे पुरेसे नाही! तुम्ही पूर्ण लक्ष देऊन गाडी चालवणे गरजेचे असते अन्यथा तुम्हीसुद्धा कोहलीप्रमाणे शून्यावर बाद होऊ शकता,’ असे उत्तराखंड पोलिसांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले. मात्र, आता उत्तराखंड पोलिसांनी हे ट्विट डिलीट केले आहे.

ड्रायविंगबाबत जागरूकता आणण्यासाठी उत्तराखंड पोलिसांनी कोहली शून्यावर बाद होण्याचे उदाहरण दिले हे चाहत्यांना फारसे आवडले नाही. चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कोहलीला समर्थन दर्शवताना उत्तराखंड पोलिसांवर टीका केली होती. त्यामुळे आता उत्तराखंड पोलिसांना त्यांचे ट्विट डिलीट करावे लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!