🕒 1 min read
अह्मदाबाद : कसोटी मालिकेत इंग्लंड संघावर दणदणीत विजय मिळाल्यानंतर इंग्लंड मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. अवघ्या १२५ धावांचे माफक अव्हान इंग्लंडसंघाने २ गडी गमावून लक्ष्य गाठल. सोळाव्या षटकातच इंग्लंडने विजयी लक्ष्य गाठलं.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी-२० सामना रविवारी खेळला जाणार आहे. पहिल्या टी-२० सामन्यात निराशाजनक कामगिरी करत पराभव पत्करणाऱ्या भारतीय संघाचे या सामन्यामध्ये दमदार पुनरागमन करण्याचे लक्ष्य असेल. पहिल्या सामन्याच्या खेळपट्टीवर नक्की काय केले पाहिजे हे आम्हाला कळले नाही, अशी कबुली सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने दिली. परंतु, या मालिकेचे सर्वच सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळले जाणार असल्याने भारताला या खेळपट्टीवर कसा खेळ करायचा याचा लवकरच शोध लावावा लागणार आहे.
पहिल्या टी-२० सामन्यात इंग्लंडने भारतावर ८ विकेट राखून मात केली. भारताचा हा तीन महिन्यांत पहिलाच मर्यादित षटकांचा सामना होता. त्यामुळे लोकेश राहुल, हार्दिक पांड्या आणि युजवेंद्र चहल यांसारख्या प्रामुख्याने मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंना लय सापडली नाही हे समजण्यासारखे आहे. परंतु, कर्णधार कोहलीच्या बॅटमधून धावा होत नसल्याची भारतीय संघाला नक्कीच चिंता असेल. या सामन्यात कोहली खातेही न उघडता माघारी परतला.
महत्त्वाच्या बातम्या
- आलिया भट्टची रणबीर कपुरच्या आठवणीत भावनिक पोस्ट
- ‘एमपीएससी परिक्षा २१ मार्च रोजी, सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा’
- नागरी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याकडून पाहणी
- शाळेच्या अनुदानासाठी १४० कोटीच्या निधीस मंजुरी : वर्षा गायकवाड
- महिलांचा आर्थिकस्तर उंचाविण्याचा जीवनज्योती अभियानातून प्रयत्न-मंगेश गोंदावले


