Share

कन्नड मध्ये १५३ दात्यांचे रक्तदान

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शिक्षणमहर्षी स्व.कृष्णराव जाधव यांच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त सचिव सागर जाधव यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या रक्त पुरवठा अभियानास कन्नड शहर व तालुक्यातील दात्यांनी उदंड प्रतिसाद देत १५३ दात्यांनी रक्तदान केले.

कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत आहेत. यामुळे एक सामाजिक जबाबदारी म्हणून जिजामाता परिवाराने सर्व शासकीय नियमांचे पालन करत या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. रक्तदात्यांना सचिव सागर जाधव यांच्या हस्ते मास्क व सॅनीटायझरचे वाटप करण्यात आले. सोबतच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यात अयोध्या येथील राम मंदिरासाठी २१ हजार रुपयांची मदत, गडकोट किल्ल्यांच्या संवर्धनासाठी काम करणा-या सह्याद्री प्रतिष्ठाणला ५ हजार ५५५ रुपयाची मदत देण्यात आली. तसेच गोरगरीब विद्याथ्र्यांना शालेय साहित्याचे वाटप, रुग्णांना फळ वाटप, गाईंना चारा वाटप करण्यात आले. यावेळी माजी आ.नामदेवराव पवार, नगराध्यक्ष संतोष कोल्हे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजय खंबायते, सभापती प्रकाश घुले, संचालक अशोक मगर, तेजराव नीळ, उदय जाधव, किशोर वाळुंजे, नगरसेवक काकासाहेब ठोकळ, संतोष निकम, अनिल आल्हाड, उद्योजक संजय भारुका, उमेश नटाणी यांची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!