🕒 1 min read
मुंबई : आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर बीसीसीआयने भारतीय संघाची इंग्लंड दौऱ्यासाठी घोषणा केली. या दौऱ्यात पहिले भारतीय संघ जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळेल. १८ ते २२ जुनदरम्यान साउथहॅप्मटन येथे भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान ही लढत होईल. यानंतर ऑगस्ट महिन्यात इंग्लंड संघासोबत ५ कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे. मुंबईमध्ये दहा दिवसांचा कॉरंटाईन कालावधी पूर्ण करून भारतीय संघ २ जूनला इंग्लंडला रवाना होणार आहे.
भारतीय संघातले सगळे खेळाडू कोरोनाच्या नियम आणि अटींना अधिन राहून मुंबईत क्वारंटाईन आहे. याचदरम्यान खेळाडू सोशल मीडियावर बरेच सक्रिय दिसत आहेत. कर्णधार विराट कोहली देखील सोशल मीडियावर सक्रिय दिसत आहे.

यावेळी तो आपल्या चाहत्यांशी इन्स्टाग्रामवरुन संवाद साधतो आहे. याचदरम्यान एका चाहत्याच्या ‘ट्रोलर्स आणि मीम्सना कसं उत्तर देतोस?’ या प्रश्नाला विराटने अगदी हटके उत्तर दिलं आहे. विराटने उत्तर म्हणून आपल्या इन्स्टा स्टोरीत एक फोटो शेअर केला. हाच तो फोटो असून यातून विराट सांगू इच्छितो की, ‘मी ट्रोलर्सना उत्तर देत नाही, तर माझ्या बॅटमधून धावा करुन माझी बॅट त्यांना उत्तर देते.’
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सर्वत्र अंधार दिसत होता, ते दीड वर्ष नीट झोपू शकलो नाही’
- श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या सामन्यात बाद झाल्यावर केलेल्या ‘या’ चुकीमुळे तमिम इक्बालने ठोठावला दंड
- शालूच्या फोटोवर कमेंट्सची गर्दी ; पहा घायाळ करणारा अंदाज
- आयपीएलची घोषणा केली, मात्र टी-२० विश्वचषकासाठी मागितला एक महिन्याचा अवधी; खरे कारण आले समोर
- माही आणि चिकूचं नातं दोन शब्दात सांग ; विराटला चाहत्याचा प्रश्न , दिलं ‘हृदय’ जिंकणारं उत्तर!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

