🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोनानंतर आलेले नवे संकट म्हणजे ओमायक्रॉन. ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतांना दिसून येत आहे. महाराष्ट्रात रविवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये औरंगाबादच्या रुग्णाचा समावेश असल्याने औरंगाबाद प्रशासन खडबडून जागे झाले असून शहरांमध्ये रहिवासी राहत असलेल्या भागातील रहिवाशांना सदर रुग्णाच्या नातेवाईकांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती मनपा प्रशासनातर्फे देण्यात आली.
पॉझिटिव्ह आढळून आलेला हा रुग्ण इंग्लंडचा प्रवास करून औरंगाबादेत आला होता. मात्र त्यानंतर पुन्हा मुंबईत गेल्यावर त्याचा ओमायक्रोनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आला आहे. पॉझिटिव्ह आल्यानंतर हा शहरातील ज्या भागात राहत होता त्या भागातील नागरिक तसेच त्याच्या नातेवाईकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. याआधी मराठवाड्यातील लातूरमध्ये ओमायक्रोनचा पहिला रुग्ण आढळून आला होता.
सद्यस्थितीत औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबाद कोरोना रुग्ण वाढतांना दिसून येत आहेत. त्या तुलनेत लातूर, परभणी, जालना, नांदेड व हिंगोली या जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी आहे. महाराष्ट्रात रविवारी आढळून आलेल्या सहा जणांमध्ये चार जण मुंबईतील आहेत. औरंगाबादच्या पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रूग्णाला मुंबईतील सेव्हन हिल रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. या रुग्णाने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले असून सध्या कुठल्याही प्रकारचा त्रास त्याला झालेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने निवडला वर्षातील सर्वोत्कृष्ट T20 संघ; कोहली-रोहितला दिला डच्चू
- ”इथे प्यायला पाणी नाही अन् राज्य सरकारने दारु स्वस्त केली, आता लोकांनी दारु प्यायची का?”
- ‘त्या’ पार्टीत कोण मंत्री होते हे जाहीर करा, अन्यथा…; पेडणेकरांचं शेलारांना आव्हान
- Pro Kabaddi : विकास कंडोला करणार हरियाणाचे नेतृत्व
- सहकार क्षेत्र खाजगी लोकांच्या घशात घालण्याचे षडयंत्र चाललेले आहे-देवेंद्र फडणवीस


