औरंगाबाद : महापालिका निवडणुका केव्हा जाहीर होणार हे अद्याप स्पष्ट नसले तरी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान, तसेच संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांच्या अध्यक्षतेखाली तालुकानिहाय बैठका झाल्या. युवसेनेच्या माध्यमातून संवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेसचे बूथ कमिटी स्थापन करण्याचे काम सुरू आहे. भाजप १६ ऑगस्टपासून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात करणार आहे. मात्र या सगळ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कुठेही दिसून येत नाही. शहरात राष्ट्रवादीचे अस्तित्वच उरलेले नसल्याची एकंदरीत परिस्थिती आहे.
येणाऱ्या औरंगाबाद मनपा निवडणुकीत महा विकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेस बाजी मारतील असे दिसून येत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्या गोतावळ्यापासून दूरच आहे. शिवसेनेने शहरात शिवसंपर्क अभियान राबविले. याअंतर्गत शहरातील ११५ वॉर्डात नागरिकांशी, कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. आमदार तथा शिवसेनेचे प्रवक्ते अंबादास दानवे, माजी खा. चंद्रकांत खैरे, आ. संजय शिरसाठ, आ. प्रदिप जैस्वाल हि संपूर्ण फळी यात दिसून आली.
काँग्रेसही आता पिछाडीवर नाही. हे पदोपदी सिद्ध होत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाची घोषणा केल्यानंतर शहर काँग्रेस कमिटीत नवचैतन्य संचारले आहे. वॉर्डा वॉर्डात जाऊन काँग्रेस बुथ कमिट्यांची स्थापना करत आहे. काँग्रेसचे संपर्क प्रमुख अमित देशमुख सतत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून मनपा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या तयारीचा आढावा घेत असतात. मात्र या संपूर्ण घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कुठेही दिसून येत नाही. मनपा निवडणूका लवकरच होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची औरंगाबादेतील ताकद निव्वळ शून्य असल्याचे दिसून येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘या’ राज्यात आता कोरोनाची तिसरी लाट? ; ११ दिवसात ५४३ बालकांना कोरोनाची लागण
- महाविकास आघाडी सरकार ओबीसी आरक्षणाबाबत गंभीर नाही-चंद्रशेखर बावनकुळे
- ‘पवार साहेबांचेही या गोष्टींवर लक्ष’; चित्रा वाघ यांचे पुण्यातील पत्रकार परिषदेत भाष्य
- पाऊस नसल्याने सावळदबारा परिसरातील खरिपाची पिके आली धोक्यात
- ‘हायकोर्टाने सूचित केल्यामुळे आता राज्यपाल लवकरात लवकर निर्णय घेतील’-नवाब मलिक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

