औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील सावळदबारा परिसरात जोरदार पाऊस नसल्याने खरिपातील पिके धोक्यात आले असून शेतकरी जोरदार पावसाची वाट पाहत आहेत. परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस नसल्याने शेतक-यांची चिंता वाढली आहे. त्यात कधी कडक ऊन तर ढगाळ वातावरण होत आहे. पिके सुकण्यास सुरुवात झाली असून पाऊस नसल्याने खरिपातील पिक धोक्यात आल्याचे चिन्ह सध्या परिसरात बघायला मिळत आहे.
सावळदबारा परिसरात सोयाबीन, कपाशी, मका, तुर, मुग, उडीद पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. मात्र पाऊस नसल्याने काही शेतक-यांनी पाणी देण्याची तयारी सुरू आहे. सोयगाव तालुक्यातील सावळदबारा परिसरात जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये जोरदार पाऊस झाल्याने शेतक-यांनी पेरणी केली होती. त्यात काही दिवसानंतर पावसाने दांडी मारल्याने काही शेतक-यांना दुबार पेरणी करावी लागली होती. पेरणी केल्यानंतर जोरदार पाऊस झाल्यामुळे पिके सुद्धा चांगली आली.
मात्र पुन्हा पावसाने दडी मारल्याने पिके सुकून जात आहे. रोज ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने शेतक-यांना पावसाची आशा लागते आहे. दरम्यान, यामुळे पिकांची वाढ होत नसून उत्पादनात घट होण्याची चिंता शेतक-यांना सतावत आहे. एकीकडे पावसाचा अभाव तर दुसरीकडे तालुक्यातील शेतक-यांच्या शेतातील पिकांचे वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात नुकसान करत असल्याने वन विभागाने या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना उपतालुकाप्रमुख गुलाबराव कोलतेंसह शेतकरी करीत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पूजा चव्हाण प्रकरणातील आरोपी संजय राठोड अद्यापही मोकाट कसा?’, चित्रा वाघ यांचा सवाल
- ‘चिक्की घोटाळ्यात अजून गुन्हा का दाखल केला नाही?’, हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
- ‘पुरुषोत्तम खेडेकरांनी मनाला वाटेल ते लिहिल्यामुळे मराठ्यांची डोकी भडकली!’
- ‘शरद पवारांनी राष्ट्रवादी स्थापन केल्यानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला’, राज ठाकरेंचा गंभीर आरोप
- शाळांच्या १५ टक्के शुल्क कपातीचा जीआर जारी, जाणून घ्या सविस्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

