औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत मोठी घट नोंदवण्यात आली आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण संख्याही कमी झाली आहे. शनिवारी औरंगाबाद महानगर पालिका क्षेत्रात केवळ १३ रुग्णांची भर पडली. तर ग्रामीण भागातूनही केवळ २७ रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत. कोरोनाची दुसरी लाट आता संपली असून रुग्ण संख्येतील घट औरंगाबादकरांसाठी निश्चितच दिलासादायक आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार शनिवारी जिल्ह्यातील ६१ जणांना (मनपा – १६, ग्रामीण ४५) सुटी देण्यात आली. आजपर्यंत १ लाख ४२ हजार ३३१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण ४० कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख ४६ हजार ३७४ झाली आहे. आजपर्यंत एकूण ३४३७ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण ६०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
कोरोनाचा धोका कमी झालेला असला तरी अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्ह्यात काही निर्बंध वाढवण्यात आले आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन केले तरच कोरोनाची तिसरी लाट आपण थांबवू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बंडातात्या कराडकरांना पोलिसांनी ताब्यात घेणे हा तमाम वारकऱ्यांचा अपमान’
- बीडमध्ये उद्या मराठा आरक्षण जनसंवाद; छत्रपती संभाजीराजेंची उपस्थिती
- ‘राज्यपालांच्या सगळं लक्षात आहे, फक्त ते आमदारांच्या यादीचे विसरलेत’, ‘त्या’ पत्रावरून राऊतांचा टोला
- ‘राजभवनचे अधिकारी राज्यपालांना माहिती देत नसतील तर यापेक्षा वाईट काहीच नाही’
- ‘राजकीय उद्देशातून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले’, नवाब मलिकांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

