बीड : वारकरी संप्रदायातील थोर संत वामनभाऊ महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा आज लाखो भक्तांच्या उपस्थितीत गहिनीनाथ गडावर मोठया उत्साहात पार पडला. वारकरी सांप्रदायासाठी संपूर्ण जीवन समर्पित करणारे सिद्धपुरुष संत म्हणून वामनभाऊ महाराज यांची कीर्ती आहे. त्यांनी किर्तन, प्रबोधनाच्या माध्यमातून समाजात दिशादर्शक विचारांची पेरणी केली. अनिष्ठ रूढी, परंपरा बंद करण्याचा उपदेश करताना माणूस म्हणून जगण्याचा मूलमंत्र त्यांनी समाजाला दिला. या कार्यक्रमास भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि त्यांच्या भगिनी बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे देखील उपस्थित होत्या.
तत्पूर्वी बीडचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. ‘गहिनीनाथ गड तमाम भाविकांचे श्रद्धास्थान आहे, कुठेही असो हा क्षण कधी चुकवू दिला नाही. तुमच्या सर्वांमध्ये मला वामनभाऊंचे दर्शन घडते म्हणून तुमच्या दर्शनासाठी मी इथं येते. पालकमंत्री असताना गडाच्या विकासाकरिता योगदान दिले, पुढेही देत राहू. आज देण्यासारखं काही नसलं, तरी प्रेमाची देवाणघेवाण मात्र, होत राहील’, असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
‘संयम, क्षमाभाव आणि परोपकार ही संतांची शिकवण आत्मसात करण्याची खरी गरज आहे, त्यांच्या संघर्षाची ज्योत घेऊन पुढे चालायचे आहे. संत वामनभाऊंचे विचार दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष आचरणात आणून कर्म केले तरच पुण्य लाभेल असे म्हणत आपण मिळालेल्या संधीचं सोनं केल, भविष्यातही करील’, असे सांगत पंकजा यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी सत्ताधाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी पंकजा मुंडे व खासदार प्रीतम मुंडे यांच्यावर सर्व सामान्य जनता व कार्यकर्त्यांचे किती अलोट प्रेम आहे, याची प्रचिती आज दिसून आली. गहिनीनाथ गडावर आगमन झाल्यानंतर व्यासपीठाकडे जाताना कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे व खासदार प्रीतम मुंडे यांच्यावर जेसीबीने फुलांची उधळण करत जल्लोषात स्वागत केले. या स्वागताने मुंडे भगिनी भारावून गेल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेसवाल्यांनी रामाचे नाव न घेतलेले बरे; भाजप नेत्याचा प्रहार
- कॉंग्रेस ‘प्रदेशाध्यक्ष’ पदी नाना पटोले यांची वर्णी
- मराठा आरक्षणासाठी केंद्राने संवैधानिक तरतूद करावी ! अशोक चव्हाणांची केंद्राला गळ
- सचिनचा भारतरत्न परत घ्या, संभाजी ब्रिगेडची मागणी
- …अन अजितदादा आर आर आबांच्या आठवणीने गहिवरले !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
