औरंगाबाद : शहरातील प्रभाग रचनेसह चक्रानुक्रम आरक्षणावर आक्षेप घेणारी याचिका माजी नगरसेवक समीर राजूरकर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली आहे. याचिकेवर २९ नोव्हेंबर रोजी सुनावणी अपेक्षित आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महापालिका निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तसेच आरक्षणाबाबत दाखल याचिकेवरही सुनावणी न झाल्यामुळे निवडणूका लांबतच चालल्या आहेत. येत्या २९ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असल्याने इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
चुकीच्या पद्धतीने वार्ड आरक्षण केल्याचा आरोप करीत माजी नगरसेवक समीर राजूरकर व इतर चार जणांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने या प्रकरणात परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्यानंतर एकदाही प्रकरण न्यायालयासमोर आलेले नाही. याचिकेतील वेगवेगळ्या प्रतिवादींनी आपले शपथपत्र अजूनपर्यंत का दाखल केले नाही? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासन हे सरकारच्या हातचे बाहुले असल्यासारखे काम करीत असल्याचा आरोप इच्छुक उमेदवार करत आहेत.
राज्य निवडणूक आयोगातर्फे अॅड. अजित कडेठाणकर यांनी या १२ नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीशांच्या पीठासमोर प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली. सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यानंतर योग्य त्या खंडपीठासमोर प्रकरण सुनावणीस ठेवण्यात यावे असे निर्देश दिले. महापालिकेतर्फे अॅड. अनिरुद्ध माई यांनी तर याचिकाकर्ते राजूरकर यांच्यातर्फे अॅड. देवदत्त पालोदकर आणि अॅड. शशीभूषण आडगावकर यांनी काम पाहिले.
महत्त्वाच्या बातम्या
- मी तर एक छोटे प्यादे आहे, मोठे खेळाडू तर….; सचिन वाझेचे खळबळजनक वक्तव्य
- परमबीर सिंह आणि अनिल देशमुख यांच्यातील वादावर सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता
- विश्वासघातानं गेलेलं सरकार मेहनतीनं आणता येतं; चंद्रकांत पाटलांचा विश्वास
- वीर दासने ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर दिले स्पष्टीकरण , म्हणाला..
- ‘आम्ही हिंदू धर्माचे पालन करतो’, मलिकांच्या फोटोला वानखेडेंचे फोटोनेच प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

