औरंगाबाद : कोरोनाचे नियम पाळाल तरच शहरातील पेट्रोल पंपावर नागरिकांना पेट्रोल मिळणार असल्याचा निर्णय पेट्रोल डिलर्स असोशिएशनने घेतल्याची माहिती असोशिएशनचे अध्यक्ष अखिल अब्बास यांनी दिली आहे. कोरोनाचा संसर्ग खुप मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. तर महानगर पालिका, आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन हा संसर्ग कमी करणे तसेच अटकाव करण्यासाठी शर्थिचे प्रयत्न करत असल्याचे अध्यक्षांनी या वेळी सांगितले.
काही दिवसांपुर्वी महानगर पालिका, पोलिस प्रशासनाने जे पेट्रोल पंप कोरानाचे नियम न पाळल्याने शहरातील ३ ते ४ पेट्रोलपंप सील केले आहे. याची माहिती सर्वांना मिळाल्यानंतर पेट्रोल असोशिएशनने सांगितले आहे की, मास्क न घातलेल्या ग्राहकांना पेट्रोल दिल्या जाणार नाही. तसेच कोराना आणि लॉकडाऊनचे नियम पाळूनच पेट्रोल मिळणार आहे. सोमवार ते शुक्रवारदरम्यान पहाटे पाच ते रात्री आठ वाजेदरम्यान ग्राहकांना पेट्रोल देण्यात येणार आहे. तर व्यतिरीक्त पेट्रोल देण्यात येणार नाही. दरम्यान अत्यावश्क सेवेत काम करणारे नागरिकांना पेट्रोल देण्यात येणार आहे. तर अत्यावश्यक सेवेत काम करत असल्याचे ओळखपत्र सोबत ठेवणे गरजेचे असल्याचेही या अब्बास यांनी सांगितले.
दरम्यान संचारबंदीचा कालावधी सुरु होण्याअगोदर म्हणजेच सायंकाळी ७ वाजेपर्यंत पेट्रोल भरुन घ्यावे. परंतू ग्राहकांनी पेट्रोल पंपावर गर्दी करु नये. तसेच विना मास्क पेट्रोल पंपवर अजिबात येवू नये. तसेच सोशल डिस्टंसिंग पाळावे, तसेच कोरोनापासुन वाचण्यासाठी सरकारने दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करुन सहकार्य करण्याचे आवाहन या वेळी असोशिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आहेत आणि त्याच राहतील, बाहेरच्यांनी…काँग्रेसचा राऊतांना टोला
- पत्रकार परिषदेमध्ये जो पेन ड्राईव्ह दाखवला तो संवादाचा की गाण्याचा, मिटकरींचा सवाल
- भांडूपच्या ड्रिम मॉलमधील सनराईस रुग्णालयच्या आगीत दहा जणांचा मृत्यू
- ‘आव्हाड आणि मलिकांनीच तो अहवाल तयार करून कुंटेंना सही करायला लावली’
- ‘नवनीत राणांनी तेव्हा आवाज उठवला असता तर दीपाली चव्हाणचा जीव वाचला असता’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
