🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे तीन महिने चिंतेचे असतील, असा इशारा केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिला आहे. दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेतील रुग्णांची संख्या दीडपटीने जास्त असण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महापालिकेच्या वतीने तयारी पूर्ण करण्यात आली आहे. दुसऱ्या लाटेत ज्याप्रमाणे ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली ती कमतरता तिसर्या लाटेत होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मनपा प्रशासन सज्ज असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.
कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरीही तिसऱ्या लाटेची भिती तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे. तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने केंद्रीय सचिवांनी येणारे तीन महिने जोखमीचे सांगितले आहेत. या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली होती. ऑक्सिजन अभावी रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. याच पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता पडणार नाही याची मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे पुरेपूर काळजी घेतली जात आहे.
याबाबत मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले, मेल्ट्रॉन कोविड सेंटरमध्ये यापूर्वी १२८ बेड्स होते. आता ३४५ बेड्सचे रुपांतर ऑक्सिजन बेड्समध्ये करण्यात आले आहे. मेल्ट्रॉनमध्ये २५० लिटर ऑक्सिजन जनरेशन प्लांट कार्यान्वित करण्यात आला आहे. तर ८५० लिटरचा दुसरा प्लांट येत्या ३ ते ४ दिवसात सुरु होईल. २० केएलचा ऑक्सिजन टँकदेखील याठिकाणी बसवण्यात येणार आहे. पद्मपुरा कोविड सेंटरमध्ये देखील १०० ऑक्सिजन बेड्स बनवण्यात येणार आहे. बालकांसाठीच्या विशेष गरवारे कोविड सेंटरमध्ये ५९० लिटर पर मिनिट ऑक्सिजन निर्मिती प्लांट कार्यान्वित करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू करणार-विजय वडेट्टीवार
- राज्यपालांनी ‘ती’ मागणी करणे हे संसदीय लोकशाही पद्धतीस मारक; मुख्यमंत्र्यांचे जशास तसे उत्तर
- आरसीबीचा निळ्या जर्सीद्वारे कोवीड योद्ध्यांना सलाम
- कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांसाठी स्वतंत्र योजना- अजित पवार
- मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत एखाद्या मंत्र्यांचा राजीनामा वाचण्याची ती पहिलीच वेळ असेल – राठोड


