Share

औरंगाबाद महापालिकेला हव्यात २० लाख लसी!

Published On: 

औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधक लसीसाठी शहरात नागरिकांची धावाधाव सुरूच आहे. कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोससाठी वेटींग तब्बल ५५ हजारांच्या पुढे गेली आहे. अनेकांचे शासनाने ठरवून दिलेले ८४ दिवस कधीच संपले असून, दररोज चौकशी करूनही त्यांना डोस मिळत नसल्याचे चित्र आहे. त्याच बरोबर पहिल्या डोससाठी देखील नागरिकांची ओरड सुरू आहेत. महापालिका प्रशासनाचे मात्र केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या लसींच्या साठ्याकडे डोळे लागले आहेत. शहरात १८ वर्षावरील नागरिकांची संख्या अंदाजे १० लाख एवढी असल्याचे मानले जात आहे. त्यानुसार महापालिकेला २० लाख डोसची गरज आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीकरण वाढविण्यासाठी केंद्र शासनाकडून वारंवार सूचना केल्या जात आहेत पण दुसरीकडे लसींचे मुबलक प्रमाणात डोस मिळत नसल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. महापालिकेने आत्तापर्यंत पाच लाख लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला असला तरी त्यात दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या मात्र केवळ सव्वा लाखांच्या घरात आहे. आठवडाभरासाठी किमान एक लाख डोस मिळाव्यात अशी माहापालिकेची मागणी आहे. पण केवळ १० ते १५ हजार लसी दिल्या जात आहेत.

सोमवारी रात्री तर पाच हजार लसी मिळाल्या होत्या. महापालिकेने दररोज १५ ते २० हजार लसीकरण करण्याची व्यवस्था करून ठेवली आहे. पण लसींचा साठा नसल्याने लसीकरणात वारंवार व्यत्यय येत आहे. १८ वर्षापुढील नागरिकांचे लसीकरण सुरू झाल्यानंतर लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागत आहेत. त्या अद्याप कायम आहेत.

कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर ८४ दिवसांचे केल्यानंतर महापालिकेकडे लसींचा साठा होता. त्यानुसार गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लसीकरण करण्यात आले. आता दुसरा डोससाठी वेटींगवर असणाऱ्यांची संख्या प्रत्येक दिवसी १० ते १५ हजारांनी वाढत आहे. बुधवारचा आकडा ५५ हजारांच्या घरात होता. पाच हजार लसी मिळत असताना त्या ५५ हजार नागरिकांना कशा देणार? या विवंचनेत प्रशासन आहे.

पहाटेपासूनच केंद्रावर रांगा

दुसऱ्या डोसचे ८४ दिवस संपलेले नागरिक सध्या हवालदिल आहेत. अनेक जण पहाटे पाच वाजेपासूनच लसीकरण केंद्रावर टोकन घेण्यसाठी रांगेत थांबत आहेत. उशिरा केल्यास टोकन मिळणार नाही म्हणून, तब्बल पाच तास नागरिक केंद्रावर बसून राहत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!