औरंगाबाद : राज्याचे गृहमंत्री दोन दिवसीय शहराच्या दौऱ्यावर होते. पाहिल्या दिवशी त्यांनी परिक्षेत्रातील जिल्ह्यांचा आढावा घेतला. त्यात त्यांनी शहरातील मोजक्याच पत्रकारांना सोबत घेऊन थोडक्यात पत्रकार परिषद आटपून त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीला प्राधान्य दिले. तसेच दुसऱ्या दिवशी घटक पक्षातील माजी खासदारांच्या घरी पाहूणचार घेतला.
शहरात गृहमंत्र्यांचा दौरा म्हणजे पोलिसांना वेगळाच ताण, त्यात गृहमंत्री शहरात दोन दिवस थांबणार असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांना वरिष्ठांनी वेगळीच ताकीद दिली होती. पहिल्या दिवशी गृहमंत्र्यांनी पोलीस आयुक्तालयात आढावा बैठक घेतली. त्यात जिल्ह्यातील तसेच परिक्षेत्रातील गुन्ह्यांचा मोघम आढावा त्यांनी घेतला. त्यानंतर त्याची माहिती देण्यासाठी मोजक्याच आणि ठराविक निमंत्रित पत्रकारांना घेऊन त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
दरम्यान, पत्रकार परिषदेत त्यांनी सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांची माहिती घेतल्याचे पत्रकारांना सांगितले. मात्र, त्यात परिक्षेत्र अथवा जिल्ह्यातील गुन्ह्यांची आकडेवारी त्यांनी जाहीर न करता, मोघम माहिती पत्रकारांसमोर ठेवली. यात त्यांनी काही जिल्ह्यांच्या कामाची स्तुती केली, तर काही जिल्ह्यांना गती गुन्ह्यांसंदर्भात गती देणार असल्याचे सांगितले. मात्र ते जिल्हे कोणते हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यानंतर त्यांनी घटक पक्षातील माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या निवासस्थानी चांगलाच पाहुणचार घेतला. यावरून दौऱ्यादरम्यान गृहमंत्र्यांना मोजकेच पत्रकार पाहिजे असल्याची चर्चा शहरात सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘लोकांच्या लक्षातही येणार नाही अशा प्रकारे मोदी सरकार खिसा कापत आहे’
- RBI चा मास्टरकार्डला दणका! झाली ‘ही’ मोठी कारवाई
- भाजपची तिरकी चाल; नितेश राणेंची मुंबई महापालिका निवडणूक कोअर कमिटीवर वर्णी
- असा राहिला भारतीय महिला संघाचा इंग्लंड दौरा..
- ‘लवकर बरा हो चॅम्पियन!’ ; रिषभ पंत कोरोना पॉझिटिव्ह आढळताचं हरभजनने व्यक्त केली चिंता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

