Share

लसीकरणाच्या योग्य नियोजनात औरंगाबाद पालिका अपयशी- समीर राजूरकर

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : शासनाकडून कोरोना प्रतिबंधक लसींचा कमी पुरवठा होत असताना लसीकरणाच्या योग्य नियोजनाअभावी शहरवासीयांचा मोठा छळ होत आहे. अनेक केंद्रावर गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडत आहे. त्यातून पुन्हा कोरोनाचा संसर्ग अधिक पसरण्याची भीती आहे. त्यामुळे महापालिकेच्या यंत्रणेने योग्य नियोजन करून लसीसाठी नागरिकांचे होणारे हाल थांबवावेत, अशी मागणी भाजपचे शहर जिल्हा सरचिटणीस समीर राजूरकर यांनी बुधवारी (दि.१२) केली.

कोरोना संसर्गास रोखण्यासाठी सरकारकडून लसीकरणाचा पर्याय उपलब्ध होताच महापालिकेने लसीकरण मोहिमेची जोरदार तयारी केली. प्रारंभी लसींचा साठा मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने ही मोहीम सुरळीत चालली. मात्र लसीचा पुरवठा कमी झाल्यापासून नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. अनेक ज्येष्ठ नागरिकांना उन्हात पाच-पाच तास रांगेत थांबूनही लस मिळत मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. अनेक केंद्रांवर तर वादावादीचे प्रकारही घडत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

त्यात पालिका प्रशासनाच्या नियोजनाअभावी नागरिकांचा छळ सुरू असल्याचा आरोप केला आहे. ज्या आरोग्य केंद्रावर गर्दी असते तिथे जास्त लसी का दिल्या जात नाहीत? कोणत्या केंद्रावर किती लसी मिळतील, हे एक दिवस आधीच जाहीर करण्यात यावे. लस नोंदणी केल्यावर मिळेल का, टोकणवरून हे जाहीर करावे. दररोज १५ हजार लसीकरणाचे नियोजन असताना १३ हजार लसी मिळाल्या तरी दोन दिवसांचे नियोजन का केले जाते? लसीकरण केंद्रावर सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. रांगेतील काही जण पॉझिटिव्ह असून शकतात, त्यांच्यापासून संसर्ग झाल्यास जबाबदार कोण? असे विविध प्रश्न या निवेदनात उपस्थित केले आहेत.

तीन सेकंदात बुकिंग हाऊसफुल : सरकाने १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी कोविन अ‍ॅपवर नोंदणी बंधनकारक केली आहे. त्यासाठी रात्री साडेआठ ते दहा अशी नोंदणीची वेळ दिलेली आहे. मात्र या वेबसाइटवर अवघ्या तीन सेकंदात रोजची नोंदणी हाऊसफुल होत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना रोजच मनस्ताप सहन करावा लागत असल्याची वास्तविकता निवेदनात मांडली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!