Share

‘मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली, पवारांना बारमालकांची काळजी; सामान्य माणसा तू…’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात मार्च महिन्यापासून पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातले आहे. यामुळे आता १ जून पर्यंत कडक निर्बंधांसह लॉकडाऊन करण्यात आला असून सामान्य जनतेला मात्र, रुग्णालयांमध्ये बेड्स, औषधे, उदरनिर्वाहाचा प्रश्न अशा संकटांचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हॉटेल, रेस्टॉरंट व्यावसायिकांसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांना मदत करण्याची मागणी केली आहे. पवारांच्या या पत्राची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. तसेच पवारांच्या या पत्रावर विरोधकांकडून प्रचंड टिका करण्यात येत आहे.

आता, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी, ‘मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली, पवार साहेबांना बारमालकांची काळजी; सामान्य माणसा तुच तुझा वाली,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना लक्ष्य केलं आहे.

‘लॉकडाऊन पुन्हा वाढला. मुख्यमंत्री म्हणालेच होते, “माझे कुटुंब, माझी जबाबदारी!”… सामान्यमाणसा,नोकरदारा, बलुतेदारा, नोकरदारा, कष्टकरी मजुरा, तूचआहेस तुझा रक्षणकर्ता. मायबाप राज्य सरकारने तुला नव्या लाटेत वाऱ्यावर सोडले आहे. तुझा EMI, तुझ घरखर्च, तुझ लाईटबिल तुच पहा. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली आहे, पवार साहेबांना बारमालकांची काळजी, तू तुझ्या कुटुंबाची जबाबदारी घे. वसुली सरकारवर विसंबून राहण्यात अर्थ नाहीत वसुली सरकार मध्ये पोलिसात वाजे तर लस द्यायला फरहान अख्तर लाडका आहे, सामान्य माणसा तुच तुझा वाली,’ असा घणाघात केशव उपाध्ये यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!