🕒 1 min read
मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या काळात भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. मात्र स्पर्धेत कोरनाचा शिरकाव झाला आणि बीसीसीआयने उर्वरित स्पर्धा रद्द केली.
दरम्यान, हैदराबाद संघातील विकेटकीपर ऋद्धिमान साहाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्याला क्वारंटाइन करण्यात आलं. यावेळी साहाच्या मुलीनं त्याच्यासाठी खास मेसेज देखील पाठवला होता. भावुक झालेला साह, हेच माझं जग आहे. म्हणत त्याने आपल्या चिमुकलीचा मेसेज ट्वीट देखील केला होता.
ऋद्धिमान साहाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर कुटुंबीय देखील खूप जास्त घाबरले होते. ऋद्धिमान साहावर नेमकी काय त्यावेळी परिस्थिती आली होती हे त्याने सांगितलं आहे. ‘रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मला खूप भीती वाटली. या विषाणूमुळे संपूर्ण पृथ्वी थांबली आहे. त्याचा संसर्ग झाल्यानंतर माझं टेन्शन आणखी वाढलं. घरातील सर्व सदस्य मला काळजीत होते. व्हिडीओ कॉलद्वारे आम्ही त्यांना खात्री दिली की यात काळजी करण्यासारखं काही मोठं नाही. माझी चांगली काळजी घेतली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- दोस्ताना नंतर कार्तिकच्या हातात बिग बजेट सिनेमा ; मराठी दिग्दर्शकासोबत करणार काम
- बॉलीवूडमध्ये टिकणे झाले अवघड, कंगनाच्या हातातून निसटले अनेक ‘एंडोर्समेंट’
- महागाईचा निषेध करत पुण्यात महिला राष्ट्रवादी काँग्रेसने घातले गॅस सिलेंडरचे व टू व्हिलर गाडीचे श्राद्ध
- जालन्यातील तरुणीचा लग्नाच्या नावाखाली मालेगावच्या तरुणाला पाच लाखांचा गंडा
- UPSC ची पूर्वपरीक्षा कोरोनामुळे लांबणीवर; आयोगाने नवी तारीखही केली जाहीर


