🕒 1 min read
बुलडाणा : ‘कोरोना काळात मंदिरे बंद आहेत, तुम्हाला वाचवण्यास कोणी येणार नाही. उपास-तापास बंद करा, अंडे-मटन खा, मुस्लिमांमध्ये कोरोनामुळे क्रिटिकल होण्याचे प्रमाण कमी आहे, कारण ते सातत्याने प्रोटीनयुक्त आहार घेत असतात असे वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी केले. त्यामुळे वारकरी संप्रदायात संतापाची लाट निर्माण झाली आहे.
त्यांच्या या वक्तव्यामुळे हिंदुचा अवमान केल्याच्या प्रतिक्रिया वारकरी संप्रदायातून उमटू लागल्या. ह.भ.प रोहिणीताई राऊत संगमनेरकर, भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले, महाराष्ट्र वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष तथा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प प्रकाश महाराज जवंजाळ,गजानन महाराज दहीकर, भाजप अध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सीताराम ठोकळ, वारकरी सांप्रदायिक कीर्तनकार ह.भ.प.प्रशांत महाराज पाटील यांच्यासह अनेकांनी आमदार संजय गायकवाड यांना फोन केले.
समाज कोरोनाच्या भयाण संकटात सापडला असताना लोकप्रतिनिधींनी समजाप्रती सहानुभूती दाखवून धीर देण्याऐवजी धार्मिक भावनेला गालबोट लावून हिंदू समाजाचे खच्चीकरण थांबवावी. कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्वच क्षेत्रातून शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. वैज्ञानिक, डॉक्टर, पोलीस, आरोग्य सेवक, संत,महंत आपापले कौशल्य पणाला लावून यावर उपाय शोधत आहे. अशा स्थितीत बुलडाण्याचे आ.संजय गायकवाड यांनी सनातन हिंदु धर्मीयांच्या भावनेला ठेच पोहोचेल असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे हिंदुंच्या, वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्यात अशी नाराजी वारकरी संप्रदायातून व्यक्त होतेय.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मुस्लीम प्रोटीनयुक्त आहार घेतात, हिंदूंनीही अंडी-मटन खावे’, आ.संजय गायकवाडांचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य
- ‘स्वाराती’त आणखी एक ऑक्सिजन प्रकल्प सुरू करा, आ.नमिता मुंदडांचे मुख्यमंत्री ठाकरेंना निवेदन
- ‘अजित पवार मराठ्यांचा घात करताहेत’, संभाजी ब्रिगेडचा आरोप
- ‘लस, ऑक्सिजन आणि पीएम मोदीही देशातून गायब!’, राहुल गांधींची बोचरी टीका
- जुलै-ऑगस्टपासून महिन्याला ६ कोटी कोव्हॅक्सिनचे उत्पादन


