Share

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना मिळणार ५ हजारांची पेन्शन,शिक्षणही मिळणार मोफत

Published On: 

🕒 1 min read

भोपाळ – मध्य प्रदेश सरकारने कोरोना कालावधीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पीडित व्यक्तींच्या कुटुंबांसाठी मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी गुरुवारी सांगितले की ज्यांच्या कुटुंबात पालकांचा मृत्यू झाला आहे,त्या कुटुंबातील मुलांना महिन्याला पाच हजार रुपये पेन्शन दिली आहे.

या निर्णयासंदर्भात माहिती देताना चौहान म्हणाले ,कोरोनामुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाली असताना आम्ही अशा दुःखी कुटुंबांना निराधार ठेवू शकत नाही. आम्ही त्यांचा आधार बनू. त्या उधवस्त कुटुंबातील मुळे राज्याची मुले आहेत, राज्य त्यांची काळजी घेईल, राज्य त्यांची चिंता करेल. शिवराज सरकार आता अशा सर्व मुलांच्या शिक्षणाची मोफत व्यवस्था करणार आहे जेणेकरून ते त्यांचा अभ्यास सुरू ठेवू शकतील.

चौहान म्हणाले, कोरोनामुळे उध्वस्त झालेल्या कुटुंबातील सर्व मुलांना मोफत शिक्षण दिले जाईल जेणेकरून ते त्यांचे शिक्षण चालू ठेवू शकतील.पात्रता नसली तरीही अशा कुटुंबांना मोफत रेशन दिले जाईल जेणेकरून जेवणाची व्यवस्था करता येईल अशी घोषणा देखील त्यांनी केली आहे.

चौहान म्हणाले, कोरोनामुळे उध्वस्त झालेल्या अशा कुटुंबातील एखादा सदस्य असल्यास किंवा एखादी महिला जिच्या नवऱ्याचे निधन झाले आहे त्याना सुद्धा आम्ही मदत करणार आहोत. अशा व्यक्तींना जर काही व्यवसाय करायचा असेल तर सरकारच्या हमीवर त्यांना व्याजाशिवाय कर्ज दिले जाईल, जेणेकरून ते आपला व्यवसाय करू शकतील.

दरम्यान, मध्य प्रदेशात कोरोनाची दुसरी लाट पाहायला मिळतआहे. दररोज 8 हजाराहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. दरम्यान,राज्यात कोरोना साथीच्या आजारात 25 दिवसानंतर थोडीशी घट झाली आहे. गेल्या 24 तासांत सर्वात कमी 8,970 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 84 लोकांचा मृत्यू देखील झाला आहे. त्याच वेळी, पॉजिटिविटी रेट खाली 14% पर्यंत आला आहे. मात्र, राज्यातील अनेक जिल्हा रुग्णालयातही बेड, औषध आणि ऑक्सिजन नसल्याच्या तक्रारी येत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!