Share

AURANGABAD – सयाजी ग्रुपचे एनराईज हॉटेल औरंगाबादमध्ये सुरू

Published On: 

औरंगाबाद- १४  मे २०२२ : सर्वोत्कृष्ट  चव आणि आपल्या सेवेने ग्राहकांना समाधानी करणाऱ्या सयाजी ग्रुप ऑफ हॉटेल्सचा आता राज्यभर विस्तार होत आहे. राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबादमध्ये सयाजीने आपले नवीन एनराईज हॉटेल सुरू केले आहे. जळगाव रोड येथे मध्यवर्ती ठिकाणी, एसबीओए शाळेसमोर, मयूर पार्क येथे आहे. यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेप्रसंगी सयाजी एनराईजचे मालक मनोज दरक आणि व्हीपी- ऑपरेशन्स, सेल्स आणि रेव्हेन्यू रक्षित शर्मा उपस्थित होते.

हे लोकेशन रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गाने चांगल्या प्रकारे जोडलेले आहे. तसेच युनेस्कोचे जागतिक वारसा असलेली स्थळे अजिंठा, एलोरा लेणी, पानचक्की आणि बीबी-का-मकबरा अशी पर्यटन स्थळे अगदी जवळ आहेत.औरंगाबादमधील सयाजीच्या एनराईजमध्ये २४ भव्य आणि ३२ आलिशान रुम आहेत. त्यासह ८ क्लब रुम आहेत . हे सर्व रुम आधुनिक सुविधांसह डिझाइन केलेल्या आहेत. प्रत्येक खोल्या वातानुकूलित आणि किंग आणि क्वीन आकाराच्या बेडने सज्ज आहेत. चहा-कॉफी मेकर, एक मिनी बार, वॉर्डरोब, वाय-फाय कनेक्टिव्हिटी, एलईडी टीव्ही आणि वैयक्तिक लाँकर अशा सुविधा या रुममध्ये आहेत.

हॉटेलमधील सुविधांमध्ये २४ तास रूम सर्व्हिस, ट्रॅव्हल डेस्क, विशेष रेस्टॉरंट्स आणि बँक्वेंट हॉल देखील आहे.हॉटेलमध्ये एकूण ३ बँक्वेंट हाँल आहेत. जे १५० ते ४०० पाहुण्यांचा पाहुणचार करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. जे खाजगी कार्यक्रम, कॉर्पोरेट मीटिंगसाठी आणि इतर  क्षणांसाठी वापरता येवू शकतात . हॉटेलमधील मोमेंट हे मल्टी-क्युझिन रेस्टॉरंट बुफे, भारतीय, कॉन्टिनेंटल आणि थाई खाद्यपदार्थ उपलब्ध करेल.

सयाजी हॉटेल्स हा भारतातील प्रीमियर अपस्केल लाइफस्टाइल हॉस्पिटॅलिटी ब्रँड आहे. जो त्यांच्या चांगला अनुभव, आदरातिथ्य आणि समृद्धीसाठी प्रसिद्ध आहे. ४-स्टार आणि ५-स्टार हॉटेल श्रेणीत सयाजी हॉटेलने नवीन मानके स्थापन केली आहेत. सयाजी हॉटेल्स, सयाजी एफोटेल आणि सयाजी एनराईज या ब्रँड नावाखाली समूह सध्या १३ हाँटेल चालवतो. प्रत्येक हॉटेल हे भरपूर मेजवानी आणि अन्न आणि पेय सेवा (फुड अँड ब्रेव्हरेज) सुविधांसह आलिशान खोल्या आहेत.

नवीन हॉटेलबाबत सयाजी एनराईजचे मालक मनोज दरक म्हणाले की सयाजी या प्रसिद्ध आणि  यशस्वी ब्रँडशी जोडले गेल्याचा आम्हाला खूप अभिमान आणि आनंद आहे. सयाजी एनराईजच्या माध्यमातून आम्ही औरंगाबादच्या जनतेला व तेथे येणाऱ्या पर्यटकांना सर्वोत्तम सेवा देऊ, असा विश्वास आम्हाला आहे. अत्यंत मोक्याचे ठिकाण, सुबकपणे तयार केलेली सजावट, चवदार मेजवानी आणि आदरातिथ्य यामुळे हे हॉटेल औरंगाबादमधील पर्यटक आणि व्यावसायिक प्रवाशांना नक्कीच आकर्षित करेल.

सयाजी हॉटेल्सचे व्यवस्थापकीय संचालक रऊफ धनानी म्हणाले की आम्ही अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या शहरांमध्ये सेवा देत आहोत. या सेवेचा आम्हाला  अभिमान आहे. औरंगाबादमध्ये आमच्या ब्रँडचे अनावरण हे माझ्या मते प्रत्येक दिवसाचे प्रत्येक पैलू महत्त्वाचे बनवेल. आमच्याकडे आलेल्या ग्राहकाचा प्रत्येक क्षण संस्मरणीय अनुभव देईल हे आमचे काम आहे.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!