मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)मध्ये पंजाब किंग्ज संघासाठी प्लेऑफचे दरवाजे आजूनही खुले आहेत. त्यांना शिल्लक राहिलेल्या एक सामन्यात मोठा विजय मिळवावा लागणार आहे. पंजाब संघ गुणतालिकेत ७ व्या स्थानावर आहे. त्यांचे १३ सामन्यांत ६ विजयासह १२ अंक आहेत. पंजाबला शेवटचा सामना हैदराबादसोबत २२ मे रोजी खेळायचा आहे. या सामन्यात पंजाबने विजय मिळवला तरी त्यांना इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागणार आहे. अश्यातच, पंजाबचा अष्टपैलू खेळाडू ओडियन स्मिथच्या धमाल शैलीतील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जो कोणी हा व्हिडीओ पाहिला असेल त्याला हसू आवरता येणार नाही. व्हिडीओत ओडियन स्मिथच्या एका शिंकेने पंजाबचा संपूर्ण संघ झाडाच्या पानांसारखा जमिनीवर पडला.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या १० सेकंदाच्या व्हिडीओमध्ये ओडियन स्मिथला अचानक शिंक येते. तो शिंकल्यानंतर समोर उभे असलेले पंजाबचे खेळाडू एकानंतर एक खाली पडतात.
Odean be like: Kyun hila dala na⁉️ ????#PunjabKings #SaddaPunjab #IPL2022 #ਸਾਡਾਪੰਜਾਬ #OdeanSmith pic.twitter.com/VpKzKMB95Y
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) May 15, 2022
चाहत्यांच्या प्रतिक्रियाही चर्चेत
पंजाबच्या अधिकृत खात्यावरून ट्विट केलेला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देताना पंजाबच्या जखमेवर हात ठेवला. चाहत्यांनी लिहिले की, व्हिडीओमध्ये जसे खेळाडू पडतात तसे तुमच्या संघातील गडीही एकानंतर एक बाद होतात. चाहत्यांचा अंदाज खरा ठरला आणि दिल्लीविरुद्धच्या सामन्यात पंजाबचा अगदी तसाच पराभव झाला.
आयपीएल २०२२ चा ६४वा सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दिल्ली संघाने पंजाबचा १७ धावांनी पराभव केला. दिल्लीसाठी शार्दुल ठाकूरने शानदार गोलंदाजी करताना ४ बळी घेतले. पंजाबकडून जितेश शर्माने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३४ चेंडूत ४४ धावा केल्या, पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. दिल्लीने २० षटकात ७ बाद १५९ धावा केल्या होत्या. पंजाबकडून लिव्हिंगस्टोन आणि अर्शदीपने ३ बळी घेतले.
महत्वाच्या बातम्या :
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

