मुंबई: मद्यसम्राट फरार उद्योगपती विजय मल्ल्याच्या मुंबईतील बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाइन्स लिमिटेडचे मुख्यालय असलेले किंगफिशर हाऊस लिलावात विकले गेले आहे. हे घर हैदराबादस्थित सॅटर्न रियल्टर्सने तब्बल ५२.२५ कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
लिलावातील किंमत ही या घराच्या राखीव किंमत १३५ कोटींपेक्षा एक तृतीयांश आहे. दरम्यान आतापर्यंत माल्याची प्रॉपर्टी विकून ७५२० कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. मल्ल्याच्या नावे १० हजार कोटी रुपये थकीत आहेत.
साधारण भारतातील विविध १७ बँकांचे ९००० कोटी रुपयांहून अधिक कर्ज विजय मल्ल्यानी थकविले आहे. विजय मल्ल्या सध्या ब्रिटनमध्ये असून त्याच्या प्रत्यार्पणासाठीही भारताकडून प्रयत्न सुरू आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळांविरोधात आमच्याकडे पुरावे, त्यांना दोषमुक्तता नको’, एसीबीचा कोर्टात दावा
- भाजप नेते प्रवीण दरेकरांची मुख्यमंत्र्यांशी बंद दाराआड चर्चा, राजकीय चर्चांना उधाण
- संसदीय मर्यादाभंग! खासदार बेफाम का होतात, याची कारणे अष्टप्रधानांनी शोधावी- संजय राऊत
- मुंबई महापालिकेचा गणेशोत्सव मंडळांना दिलासा !
- इंग्लंडचा कर्णधार जो रुटने गाठला मैलाचा टप्पा, द वॉल द्रविडला टाकले मागे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

