औरंगाबाद: मागील दोन वर्षांपासून जिल्हाभरात सुरु असलेली अवैध वाळू वाहतूक आणि त्याद्वारे बुडत असलेला शासनाचा कोट्यवधींचा महसूल पुन्हा सुरु करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून ठप्प पडलेली वाळू पट्ट्यांची लिलाव प्रक्रिया औरंगाबाद जिल्हा प्रशासनातर्फे नुकतीच करण्यात आली. २८ डिसेंबर ते २१ जानेवारी दरम्यान ई-ऑक्शनद्वारे लिलाव द्वारे जिल्ह्यातील २० पैकी ६ वाळूपट्ट्यांचा लिलाव करण्यात आला. यापैकी ४ लिलाव झाले होते तर उर्वरित दोन वाळू पट्ट्यासाठी बुधवार (१०) रोजी ई टेंडरिंग साठी जाहिरात जिल्हा प्रशासनातर्फे काढण्यात आली आहे.
मागील दोन वर्षांपासून औरंगाबाद जिल्ह्यातील वाळू पट्याच्या लिलावाची प्रक्रिया विविध कारणाने रखडली होती. त्यामुळे जिल्हाभरात चोरटी वाहतूक स्थानिक प्रशासनाच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात जिल्हाभरात सुरु होती. त्याला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध प्रयत्न केले जात असून लिलावही काढण्यात आले होते. परंतु अवैध मार्गाने चोरटी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने या लिलावाला वाळू ठेकेदारांनी पाठ दाखवली. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनाकडून २० वाळूपट्ट्यांच्या लिलावासाठी मुंबईत प्रस्ताव पाठवण्यात आले होते.
१४ वाळूपट्यांना स्टेट एन्व्हायरोनमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट अॅथॉरिटीच्या बैठकीत मान्यता मिळालेली नाही. १४ वाळूपट्ट्यां पैकी विविध कारणाने ५ वाळू घाट जिल्हाप्रशासने रद्द केले आहे तर उर्वरित ९ वाळू घाट प्रस्ताव फेर सर्वेक्षणासाठी पाठवण्यात आले आहे तर जिल्हातील ६ वाळूपट्याच्या लिलाव प्रक्रिया ८ डिसेंबर ते २१ जानेवारी दरम्यान ई-ऑक्शनद्वारे पूर्ण करण्यात आली होती. परंतु ६ पैकी फक्त चारच वाळू पट्ट्याचा लिलाव झाला असला तरी महसूल मात्र तीन कोटी ३१ लाख साठ हजार सत्त्याण्णव रुपये इतका मिळाला होता.
उर्वरित दोन वाळूपट्ट्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे जाहिरात काढण्यात आली असून १० मार्च २०२१ ते २३ मार्च २०२१ या कालवधीत ई ऑक्शन द्वारे लिलाव प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सिल्लोड तालुक्यातील भवन येथील पूर्णा नदीच्या वाळूपट्ट्याची किमत ४६ लाख ३००८० रुपये इतकी आहे. तर वैजापूर तालुक्यातील लासुरगाव येथील शिवना नदी पात्रातील वाळूपट्ट्याची किंमत ५७ लाख ८७६०० रुपये इतकी ठेवण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी अतुल दोड यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- पंकजा मुंडे अडचणीत! थकित वेतनासाठी ‘वैद्यनाथ’च्या कर्मचाऱ्यांकडून कारखाना बंद
- महानिर्मितीने रचला इतिहास, ६० वर्षातील सर्वाधिक वीज निर्मिती
- फडणवीसांचा आक्रमक पवित्रा; अशोक चव्हाणांना नोटीस तर देशमुखांवर हक्कभंग
- हिंदू धर्माबाबत आक्षेपार्ह वक्तव्या प्रकरणी शर्जिलला कोर्टाचा दिलासा
- मलकापूरमध्ये ७ क्विंटल गांजा पकडला, एक कोटींचा मुद्देमाल जप्त


