Share

अजित पवारांच्या ‘त्या’ संकेतावर अतुल भातखळकरांची खोचक टिका

Published On: 

मुंबई : राज्यातील शाळा महाविद्यालये २ ऑक्टोबरपासून सुरु होतील असे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत. यावर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट केले आहे, आतातरी ऑनलाईन शिक्षणाचा खेळखंडोबा बंद होईल अशी अपेक्षा करुया, आता घुमजाव नको. अशी खोचक टीका भातखळकरांनी केली आहे.

गेली दोन वर्षांपासून राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद आहेत. दरम्यान आता दिवाळीनंतर शाळा, महाविद्यालये सुरु होण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. राज्यातील महाविद्यालये २ ऑक्टोबरपर्यंत सुरु केली जाऊ शकतात. विद्यार्थ्यांचे दोन्ही डोस आणि शिक्षकांचेही दोन्ही डोस जर पूर्ण झाले असतील, तर याबाबत विचार केला जाऊ शकतो. असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले आहे.

भातखळकर ट्विटमध्ये म्हणतात, ‘उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या म्हणण्यानुसार राज्यातील महाविद्यालये २ ऑक्टोबरपासून आणि शाळा दिवाळीनंतर सुरु करण्याचा सरकारचा मानस आहे. हा निर्णय अंमलात आणला जाईल, शिक्षणाचा ऑनलाईन खेळखंडोबा बंद होईल अशी अपेक्षा करुया. आता घुमजाव नको.’ अशी खोचक टिका भातखळकरांनी केली आहे.

शाळासाठी मात्र अजून वेळ असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मुलांसाठी अजून डोस घेण्याचे नियोजन आखणे सुरु आहे. त्यामुळे येत्या २ ऑक्टोबरपर्यंत जर परिस्थिती आटोक्यात येण्याचे संकेत दिसले तर लवकरच शाळा सुरु केल्या जातील, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!