Share

‘…आणीबाणी, बोफोर्स तोफ खरेदीत खाल्लेल्या कमिशनमुळे झाली नाही, तशी नाचक्की ना?’

Published On: 

मुंबई : कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर ७० दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांकडे नरेंद्र मोदी सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. शेतकरी आंदोलन चिरडू पाहणाऱ्या मोदी सरकार विरोधात दिवसेंदिवस हे आंदोलन तीव्र होत आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून संयुक्त किसान मोर्चाने ६ फेब्रुवारी रोजी देशभर तीन तासांच्या चक्काजाम आंदोलनाची हाक दिली आहे. काँग्रेस पक्षाचा या ‘चक्का जाम’ला पाठिंबा आहे, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

यावेळी बोलतां त्यांनी भाजप सरकरवर सडकून टीका देखील केली. ‘दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांवर मोदी सरकारने अनन्वीत अत्याचार सुरु केले आहेत. आंदोलक शेतकऱ्यांना अन्न-पाणी मिळू नये अशी कोंडी मोदी सरकारकडून केली जात आहे. दिल्लीत प्रवेश करू नये म्हणून रस्त्यांवर मोठे बॅरिकेड्स लावून तटबंदी उभी केली आहे. रस्त्यावर खिळे ठोकले आहेत, इंटरनेट सेवाही बंद केली आहे. मोठा पोलीस फौजफाटा लावून शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतकरी आंदोलनाला जगभरातून पाठिंबा वाढत असून मोदी सरकारच्या हटवादीपणामुळे भारताची जगभर नाचक्की होत आहे,’ असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

थोरातांच्या या आरोपाला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर देताना काँग्रेसवर झालेल्या आरोपांची आठवण करून दिली आहे. ‘जी नाचक्की १९ महिने लादलेल्या आणीबाणीमुळे, सुवर्ण मंदिरातील ऑपरेशन ब्ल्यू स्टार मुळे, दिल्ली दंगलीत ठार मारलेल्या हजारो शिखांमुळे, बोफोर्स तोफ खरेदीत खाल्लेल्या कमिशनमुळे झाली नाही, तशी नाचक्की ना?’ असा खोचक सवाल त्यांनी काँग्रेसला केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!