मुंबई : देशात सद्या वातावरण तापलं आहे. केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी देखील सरकारला नामवण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. कालच, माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती.
यानंतर, आता विरोधी पक्षांनी पुढील लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोठं पाऊल उचलण्याचं ठरवलं आहे. विरोधी पक्षांची सूत्रे शरद पवार यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता युपीएमधील काही नेत्यांनी वर्तवली आहे. तसे झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात भक्कम पर्याय म्हणून शरद पवार यांना एकमताने पंतप्रधानपदाच्या दाव्यासाठी समोर आणलं जाईल अशी शक्यता काही काँग्रेस नेत्यांच्या मागणीमुळे निर्माण झाली आहे.
दरम्यान, हे वृत्त पसरताच भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवार यांच्यावर विखारी टीका केली आहे. ‘पवारांनी जो चमत्कार महाराष्ट्रात केला, तो देश पातळीवर करतील?… पवारांच्या डिक्शनरीत विश्वासघाताला चमत्कार म्हणतात, हे केवळ जाणते पवारच करू जाणे, भाजपावाल्याना हे ‘कौशल्य’ जमायचं नाही…’ असा टोला त्यांनी लगावला आहे.
पवारांनी जो चमत्कार महाराष्ट्रात केला, तो देश पातळीवर करतील?…
पवारांच्या डिक्शनरीत विश्वासघाताला चमत्कार म्हणतात, हे केवळ जाणते पवारच करू जाणे, भाजपावाल्याना हे 'कौशल्य' जमायचं नाही… pic.twitter.com/Oie8j4k2Vm— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 10, 2020
महत्वाच्या बातम्या
- पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात शिवसेनेचा एल्गार; मुंबईत आक्रमक निदर्शने
- फेसबुक युझेर्स साठी महत्वाची बातमी: ‘या’ कारणामुळे फेसबुकला विकावं लागणार व्हाट्सअप आणि इन्स्टाग्राम देखील…
- विराटच्या ‘पॅटरनिटी’ लीव्हला स्टिव्ह स्मिथचा पाठींबा
- शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या रावसाहेब दानवेंची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा : राष्ट्रवादी
- नवीन संसद भवन हे आत्मनिर्भर भारताचा साक्षीदार असेल : नरेंद्र मोदी


