Share

“…मुख्यमंत्र्यांनी विसरू नये”, अतुल भातखळकर यांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: केंद्र सरकारने एलआयसीमधील हिस्सेदारी विकण्यास काढली आहे. एलआयसीमधील फक्त ५ टक्के हिश्शाची विक्री केली जाणार असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. यावरूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशात सध्या खासगीकरणाची खाज वाढू लागली आहे, अशा शब्दांत केंद्र सरकारवर टीका केली. तर यावरच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे.

“मोदी सरकारच्या खाजगीकरणावर टीका करण्यापूर्वी या खाजगीकरणाची सुरुवात काँग्रेसचे डॉ. मनमोहन सिंह अर्थमंत्री झाले असताना ३० वर्षांपूर्वी केली होती हे मुख्यमंत्र्यांनी विसरू नये. योग्य माहितीच्या आधारे टीका करण्याची मुख्यमंत्र्यांना कधीच गरज वाटत नाही इतके ते स्वतःला स्वयंभू समजतात.”, असा टोला अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत लगावला आहे.

दरम्यान भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाच्या कार्यक्रमात बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, “देशात अनेक  नवनवीन गोष्टी बघायला मिळत आहेत. आज जे समोर चित्र दिसतेय, ते म्हणजे खासगीकरणाची खाज वाढू लागली आहे. कुठे कुठे खाजवणार आणि काय काय खासगी करणार याची काही कल्पनाच नाही.”

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!