🕒 1 min read
मुंबई : कोरोनाची दुसरी लाटेतील रुग्णसंख्या, अपुरी आरोग्य व्यवस्था, ढिसाळ नियोजन, अपुरी मदत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा तीन तासांचा कोकण दौरा अशा मुद्द्यांवरून महाविकास आघाडीवर भाजपने हल्लाबोल केला आहे. तर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं असून विरोधकांना ब्लॅक फंगस म्हणजेच काळी बुरशी असं संबोधत बोचरी टीका केली आहे.
ते पुण्यात कोविड सेंटरच्या ऑनलाईन उद्घाटनावेळी बोलत होते. संजय राऊत म्हणाले, ‘कोरोना महामारीत मुंबईत चांगल्या कामाचं जागतिक आरोग्य संघटनेसह पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कौतुक केलंय, मात्र विरोधक त्यावर टीका करतायत. शिवसैनिकांनी त्याकडे दुर्लक्ष करून कामाकडे लक्ष द्यावे, कारण विरोधक ब्लॅक फंगस आहेत.’
बोरूबहाद्दर म्हणतायत विरोधक ब्लॅक फंगस आहेत.
अच्छा, म्हणून मुख्यमंत्री @OfficeofUT
कायम कडी लावून आणि दडी मरून घरी बसलेले असतात का?लोक लाजेपायी दौऱ्यावर गेले तरी धावतपळत जेवायला घरीच येतात का?
काय निधड्या छातीचे सत्ताधारी मिळालेत महाराष्ट्राला…
#mahavasooliaaghadi pic.twitter.com/Ow5M0zweJN— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 22, 2021
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्यावर आता पलटवार केला आहे. ‘बोरूबहाद्दर म्हणतायत विरोधक ब्लॅक फंगस आहेत. अच्छा, म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कायम कडी लावून आणि दडी मरून घरी बसलेले असतात का? लोक लाजेपायी दौऱ्यावर गेले तरी धावतपळत जेवायला घरीच येतात का? काय निधड्या छातीचे सत्ताधारी मिळालेत महाराष्ट्राला…,’ अशी खोचक टिप्पणी अतुल भातखळकर यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘त्या’ व्हिडिओनंतर बाबा रामदेव यांची अडचण वाढली, IMA कडून कारवाईसाठी आक्रमक पवित्रा
- ‘…तर १ जूननंतर लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो
- आता आणखी एका जिल्ह्यातील कडक लॉकडाऊन शिथिल !
- जयंत पाटील, थोरात यांच्यावर गुन्हे दाखल करा; शिवसेना खासदाराच्या मागणीने आघाडीतील बिघाडी चव्हाट्यावर
- विरोधक ब्लॅक फंगस आहेत, शिवसैनिकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं – संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

