🕒 1 min read
कोल्हापूर : राज्यासह देशभरात कोरोनाच्या सऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू करण्यात आला असताना अनेक जिल्ह्यात मागील काही आठवड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने परिस्थिती चिंताजनक झाली होती. त्यामुळे अशा जिल्ह्यांमध्ये वा शहरांमध्ये पूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
सुमारे अर्धा महाराष्ट्र हा पूर्ण लॉकडाऊनच्या गर्तेत गेल्यानंतर मागील काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळत आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात देखील कोरोना रुग्णांची वाढती संख्या व मृत्युदर पाहता कडक लॉकडाऊन लावण्यात आला होता.
जिल्ह्यात 15 मे रात्री 12 पासून ते 23 मे पर्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. यानंतर, हा कडक लॉकडाऊन वाढणार की काही दिलासा मिळणार याकडं नागरिकांचं लक्ष लागलं होतं. आता, कोल्हापूर जिल्ह्यातील लॉकडाऊन हा शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार २३ मे रोजी १२ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन असेल. त्यानंतर २४ मे पासून राज्यातील ब्रेक दी चेन अंतर्गत असणारे नियम लागू होतील. गोकुळच्या निवडणुकांनंतर पालकमंर्यानी कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यामुळे सामान्य कोल्हापूरकरांनी तीव्रता नाराजी व्यक्त केली होती.
महत्वाच्या बातम्या
- ‘त्या’ व्हिडिओनंतर बाबा रामदेव यांची अडचण वाढली, IMA कडून कारवाईसाठी आक्रमक पवित्रा
- ‘…तर १ जूननंतर लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो
- मुख्यमंत्र्यांनी जाहिर केलेली मदत रिक्षाचालकांना दोन दिवसात मिळणार- परिवहन अधिकारी
- जयंत पाटील, थोरात यांच्यावर गुन्हे दाखल करा; शिवसेना खासदाराच्या मागणीने आघाडीतील बिघाडी चव्हाट्यावर
- विरोधक ब्लॅक फंगस आहेत, शिवसैनिकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं – संजय राऊत


