नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या काळात योगगुरु रामदेव बाबा यांच्या एका वक्तव्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये रामदेव बाबा यांनी कोरोनावरील एलोपॅथी उपचार पद्धतीबाबत अविश्वासार्हता दर्शवली आहे. त्याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने आक्रमक भूमिका घेतलीय. रामदेव बाबा यांच्यावर कारवाई कठोर कारवाई करण्याची मागणी आयएमएने आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्याकडे केली आहे.
यासाठी त्यांनी एक पत्रक जारी केलं आहे. “एक तर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी योगगुरु बाबा रामदेव यांनी केलेले आरोप मान्य करावे आणि आधुनिक उपचार पद्धती रद्द करावी. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करत त्यांच्याविरोधात साथ नियंत्रक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा”, अशी मागणी त्यांनी पत्रकात केली आहे.
IMA issues press release over a video on social media where Yog Guru Ramdev allegedly speaks against Allopathy. IMA demands that the "Union Health Minister either accept accusation & dissolve modern medical facility or prosecute him and book him under Epidemic Diseases Act." pic.twitter.com/FnqUefGjQA
— ANI (@ANI) May 22, 2021
पत्रकात IMAने म्हटले की, भारत सध्या कोविड-१९ महामारीचा सामना करत आहे. या बिकट काळात एलोपॅथी ही आधुनिक चिकित्सा पद्धती आणि भारत सरकार मिळून लोकांची जीव वाचवण्यात व्यक्त आहेत. या संर्घषात फ्रंटलाइनवर काम करणाऱ्या १२०० एलोपॅथी डॉक्टरांनी आपलं बलिदान दिलं आहे.
पत्रकात केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना उद्देशून IMA ने म्हटलं की, व्हिडिओत बाबा रामदेव म्हणतात एलोपॅथी एक मूर्ख आणि दिवाळ काढणारं विज्ञान आहे. पण जेव्हा बाबा रामदेव आणि त्यांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण हे आजारी पडतात तेव्हा ते देखील एलोपॅथीचीच औषधं घेतात. त्यामुळे बाबा रामदेव एलोपॅथीवर बिनबुडाचे आरोप करत आहेत आणि लोकांची दिशाभूल करत आहेत. कारण आपल्या बेकायदा आणि मंजुरी नसलेली औषध विकायची आहेत.
D₹ + $cientist Ramdev doesn't want allopathy to be used in curing Corona patients ???? pic.twitter.com/7l2NtKih5p
— Baba MaChuvera ???? Parody of Parody (@indian_armada) May 22, 2021
रामदेव बाबांचा व्हिडिओ
एका व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रामदेव बाबांनी एलोपॅथी ही एक मूर्ख आणि लंगडे विज्ञान असल्याचं सांगत त्याबाबत अविश्वास दाखवलाय. सर्वात आधी हायड्रोक्लोरिक्विन फेल ठरले. त्यानंतर प्लाझ्मा थेरपी आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शन, फॅबिफ्लू फेल ठरल्याचं रामदेव बाबा यांनी म्हटलंय. इतकंच नाही तर आज लाखो लोकांचा मृत्यू हा एलोपॅथीमुळे झाल्याचा दावाही त्यांनी केलाय. आज जेवढ्या रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजन न मिळाल्यानं झाला. त्यापेक्षा जास्त रुग्ण एलोपॅथी उपचार मिळाल्यानंतरही मृत्युमुखी पडल्याचं रामदेव बाबा यांनी म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या
- सोशल मीडियावरील ‘तो’ शब्द हटवा; मोदी सरकारचा फेसबूक, ट्विटरला आदेश
- ‘चक्री वादळाला लाजवेल असा दौऱ्याचा वेग होता’, मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला
- राजीव गांधींच्या मारेकऱ्यांच्या सुटकेसाठी मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे राष्ट्रपतींना पत्र
- ‘आता राष्ट्रपती, पंतप्रधानांसाठी बेड्स राखीव ठेवण्याची गरज’, दिल्ली हायकोर्टाचे मत
- सातव कुटुंबीयांच्या सांत्वनास राहुल गांधी हिंगोलीला येणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

