Share

विरोधक ब्लॅक फंगस आहेत, शिवसैनिकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं – संजय राऊत

Published On: 

🕒 1 min read

पुणे : २०१९ विधानसभांच्या निकालानंतर शिवसेनेने भाजपसोबत असलेला संसार मोडून विसंगत विचारधारा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. यानंतर, हे तीनचाकी सरकार एकमेकांच्या पायात पाय अडकून पडेल असं भाकीत करून भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.

मात्र, या सरकारने निसर्ग चक्रीवादळ, कोरोना, अतिवृष्टी, तौक्ते चक्रीवादळ अशा अनेक संकटांचा सामना करत दीड वर्षाचा कालावधी पार केला आहे. या काळात महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमधील धुसफूस देखील दिसून आली. दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट, अपुरी आरोग्य व्यवस्था, ढिसाळ नियोजन, अपुरी मदत अशा मुद्द्यांवरून महाविकास आघाडीवर भाजपने हल्लाबोल केला आहे.

आता शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा विरोधकांना प्रत्युत्तर दिलं असून विरोधकांना ब्लॅक फंगस म्हणजेच काळी बुरशी असं संबोधत बोचरी टीका केली आहे. ते पुण्यात कोविड सेंटरच्या ऑनलाईन उद्घाटनावेळी बोलत होते. संजय राऊत म्हणाले, ‘कोरोना महामारीत मुंबईत चांगल्या कामाचं जागतिक आरोग्य संघटनेसह पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कौतुक केलंय, मात्र विरोधक त्यावर टीका करतायत. शिवसैनिकांनी त्याकडे दुर्लक्ष करून कामाकडे लक्ष द्यावे, कारण विरोधक ब्लॅक फंगस आहेत.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!