🕒 1 min read
मुंबई : शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली असून उद्या ही मुलाखत प्रसारित होणार आहे. महाविकास आघाडीच्या सरकारला वर्ष पूर्ण होत आले, यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘अभिनंदन मुलाखत’ सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. या मुलखतीचा प्रोमो त्यांनी आज रिलीज करत ‘उद्या धमाका’ असे लिहिले आहे.
संजय राऊतांनी सरकारच्या वर्षपूर्तीवर मुख्यमंत्र्यांच्या घेतलेल्या मुलाखतीची पहिली झलक चांगलीच व्हायरल होत आहे. यावेळी हात धुवा सांगण्यापलिकडे मुख्यमंत्र्यांनी काय केलं असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी विचारला असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता भाजपवर निशाणा साधला आहे. हात धुवा हे सांगण्याव्यतिरीक्तही मी हात धुवून मागे लागू शकतो असा सूचक इशारा देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला आहे.
मुलाखतीच्या प्रोमोमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फक्त हात धुवा सांगण्यापलिकडे काय करतात? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना इशारावजा उत्तर दिले आहे. यावर त्यांनी ”ठीक आहे, हात धुतो आहे, जास्त अंगावर याल तर हात धुवून मागे जाईन”, असा इशारा दिला आहे.
या प्रोमोवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी खरमरीत टीका केली आहे. त्यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. ‘दात पाडू, बघून घेऊ ही रोड छाप भाषा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शोभते का? ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत की गल्लीतल्या पक्षाचे प्रमुख? बायका मुलांची धमकी कोणाला देता? मुख्यमंत्री आहात की माफिया???’ असा खोचक सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
दात पाडू, बघून घेऊ ही रोड छाप भाषा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शोभते का? ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत की गल्लीतल्या पक्षाचे प्रमुख? बायका मुलांची धमकी कोणाला देता? मुख्यमंत्री आहात की माफिया??? #सामना_मुलाखत_प्रोमो pic.twitter.com/DNfcL6eXSJ
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 26, 2020
महत्वाच्या बातम्या
- ठाण्यात पोलिसांनी मोर्चा रोखल्यानंतर मनसेचा राडा; मनसे नेते ताब्यात
- लँडलाइन फोनवरून मोबाइलवर कॉल करताना आता ‘हे’ करणे अनिवार्य असेल
- महिलांचा अपमान करणाऱ्या इंदोरीकरांची शिफारस करून सदाभाऊंनी स्वतःची किंमत कमी करून घेतली : तृप्ती देसाई
- ‘ते’ पुस्तक पूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूचं आहे : नवाब मलिक
- मोदींनी दिएगो मॅराडोनाच्या निधनाबद्दल व्यक्त केले दुःख; म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
