नागपूर: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमीच आपल्या वक्तव्यांनी चर्चेत असतात. मात्र यावेळी त्यांनी दिलेल्या एका उत्तरामुळे त्या सध्या चर्चेत आहेत. नागपूर येथे एका कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली असता त्यांना आपला आवडता नेता कोण? असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी सर्वांनाच वाटले की, याचे उत्तर म्हणजे माजी मुख्यमंत्री तथा अमृता फडणवीस यांचे पती देवेंद्र फडणवीस असतील, मात्र त्यांनी काहीतरी वेगळेच उत्तर दिले ज्यामुळे त्या सध्या चर्चेत आहेत.
यावेळी मिश्किल टिप्पणी करताना “घर की मुर्गी दाल बराबर”, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले. “माझं या प्रश्नावर उत्तर फार सोपं आहे. याचं उत्तर देणं माझ्यासाठी काही कठीण नाही. हे पाहा, सगळ्यांसाठीच घर की मुर्गी दाल बराबर असते. त्यामुळे माझे आवडते नेते नितीन गडकरी आहेत.”, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.
दरम्यान यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवरही निशाणा साधला.त्या म्हणाल्या की, राज्यात सध्या मै खाउंगा भी, खिलाऊंगा भी और खानेवालोंकी रक्षा भी करूंगा अशी परिस्थिती झाली हे. त्यामुळे आमची एकच अपेक्षा आहे की, प्रगतीचं राजकारण व्हायला हवं.
महत्वाच्या बातम्या:
केंद्राने हटवलेले निर्बंध हे दुसरे स्वातंत्र्यच आहे- संजय राऊत
आमदारांना 300 घरं देणार, मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत मोठी घोषणा
“… तर आम्ही ही कमी पडणार नाही”- ओमराजे निंबाळकर
वनविभागातर्फे सुरू असलेल्या गॅबियन बंधाऱ्याच्या कामांमध्ये भ्रष्टाचार – निलेश लंके
“कुठल्याही विभागाला दुर्लक्षित ठेवण्याची माझी भूमिका नाही”- अजित पवार

