मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी शिवसेना सांगेल त्या उमेदवाराला अतिरिक्त मतदान केले जाईल. मग तो उमेदवार संभाजीराजे छत्रपती किंवा अन्य कोणी असो, त्यालाच राष्ट्रवादी मतदान करेल असे म्हटले आहे. यावरूनच भाजप नेते निलेश राणे यांनी पवारांवर निशाणा साधला आहे.
“हे होणारच होतं. पवार साहेब आणि शब्द पाळला होऊ शकत नाही. भूमिका बदलली नाही ते पवार साहेब कसले? राजे जर शिवसेने सोबत जाणार तर संजय राऊत दुसऱ्या सीट वर आहे ज्यांनी मराठा मुक मोर्चाची मुका मोर्चा म्हणून खिल्ली उडवली होती, विसरू नका.”, असे ट्वीट निलेश राणे यांनी केले आहे.

दरम्यान कोल्हापूरचे संभाजीराजे यांनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याचे जाहीर केले असून त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, त्यांना शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच शिवबंधनासाठी मातोश्रीवर या, असा मुख्यमंत्री ठाकरेंचा निरोपही त्यांना देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “माणूसपण निभावणारा एकमेव राजकारणी…”, अविनाश जाधवांकडून राज ठाकरेंचे कौतुक
- पक्षनिष्ठा नसलेल्या व्यक्तीला भाजपात ठेवणे कितपत योग्य आहे?; ‘काँग्रेस’चा सवाल
- IPL 2022 SRH vs PBKS : पंजाबचा हैदराबादवर सोपा विजय; लिव्हिंगस्टोनची वादळी खेळी!
- IPL 2022 SRH vs PBKS : हरप्रीतनं हैदराबादला रोखलं..! पंजाबसमोर शेवट ‘गोड’ करण्यासाठी १५८ धावांचं लक्ष्य
- IPL 2022 : ओ तेरी..! आमिर खान CSKसाठी खेळणार? म्हणाला, “मी जर चांगला खेळलो, तर…”


