Share

अभिनेते अमोल कोल्हे प्रकरणावर नाना पाटेकरांची प्रतिक्रिया म्हणाले, “मी सुद्धा गोडसेची भूमिका”

Published On: 

मुंबई : सध्या सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे (NCP MP and actor Amol Kolhe) यांनी केलेल्या नथुराम गोडसेच्या भूमिकेबद्दल अनेक वाद समोर येत आहे. आता या प्रकरणात एक नवी प्रतिक्रिया समोर आली आहे.

दरम्यान ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Actor Nana Patekar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी केलेल्या नथुराम गोडसेच्या भूमिकेवर आपल्या प्रतिक्रियेत म्हणाले, गोडसेची भूमिका करणं म्हणजे गोडसेच्या प्रवृत्तीचं समर्थन करणं आहे का? असा सवाल केला. तसेच अमोल कोल्हे यांनी कोणती भूमिका करावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचं मत व्यक्त केलं. विशेष म्हणजे मीही नथुराम गोडसेची (Role of Nathuram Godse) भूमिका केली होती, असंही नाना पाटेकर यांनी आवर्जून सांगितले आहे.

अभिनेते नाना म्हणाले, “अमोल कोल्हे केवळ नथुराम गोडसेची भूमिका करत आहे. ते नटही आहेत आणि राजकारणातही आहे. त्यांनी कोणती भूमिका करावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यावर इतका वाद होण्याची गरज नाही. ‘लास्ट व्हॉईस राय – माऊंटबॅटन’ (film ‘Last Voice Rai – Mountbatten’) या चित्रपटात मी देखील नथुराम गोडसेचं काम केलं आहे, मात्र अनेकांना माहिती नाहीये.”

“गोडसेची भूमिका करणं म्हणजे गोडसेच्या प्रवृत्तीचं समर्थन करत आहेत का?” शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांच्याबाबत सांगितलं आहे. अमोल कोल्हे जेव्हा राष्ट्रवादीत नव्हते तेव्हा त्यांनी ही भूमिका केली. हे नथुरामाचं समर्थन नाहीये, ती एक भूमिका केलेली आहे. गोडसेची भूमिका करणं समर्थन नव्हे, कुणीतरी ती भूमिका करणारच आहे. मी अमोल कोल्हे यांचं समर्थन करत नाहीये. एक नट म्हणून अमोल कोल्हे यांनी काय करावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे,” असं मत नाना पाटेकर यांनी व्यक्त केलं. तसेच “कोल्हेंनी गोडसेची भूमिका केली ही काही खूप मोठी वादाची गोष्ट नाही” असे सांगत मला कोण काय करावं, किंवा टीका करण्याचा अधिकार नसल्याचं ही व्यक्त केले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!