Share

“मुख्यमंत्र्यांना शिवजयंती उत्सवावर संख्येचे बंधन घालताना जनाची नाही तर मनाची तरी…?”, भातखळकरांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयती (Shivjayanti २०२२) निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्यासाठी पाचशे जणांना परवानगी देण्यात आली आहे. याबाबत गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी मान्यता दिली आहे. मात्र यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर (BJP leader Atul Bhatkhalkar) यांनी टीका केली आहे.

“तुडुंब गर्दीत आपल्या पक्षाचे कार्यक्रम आयोजित करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना शिवजयंती उत्सवावर संख्येचे बंधन घालताना जनाची नाही तर मनाची तरी…?”,असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

दरम्यान कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून प्रत्येक सण- उत्सवांवर निर्बंध राहिले आहेत. मात्र यंदा कोरोना संक्रमण कमी होताना दिसत असताना ठाकरे सरकराने निर्बंधांत शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार यंदा शिवजयंती उत्सवही धूमधडाक्यात पार पडणार आहे. मात्र भाजपने संख्येतील मर्यादावरून ठाकरे सरकारला निशाण्यावर धरले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!