🕒 1 min read
मुंंबई : महाराष्ट्र राज्यातील राजयकीय वातावरण सध्या चांगलंच तापलं असल्याचं पाहायला मिळतं आहे. एकीकडे वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राजकीय पक्षनेते एकमेकांवर आरोप करत आहेत. तर दुसरीकडे दसरा मेळाव्याविषयी अनेक चर्चा होत आहेत. अशातच भाजप पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी दसरा मेळाव्यावरून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले अतुल भातखळकर ?
लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे? दसरा मेळावा कुठे होणार? आणि हसरा मेळावा कुठे होणार?, असे खोचक सवाल करत अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला केला आहे. यासंदर्भात अतुल भातखळकरांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एक ट्विट कलें असून, त्यामध्ये हे लिहिलं आहे.
तसेच, वेदांता प्रकल्प गुजरातला जाण्यामागे शिंद-फडणवीस सरकार जबाबदार असल्याचंही विरोधकांकडून येतं आहे. यावरही भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंना सुनावले आहे. प्रकल्प राज्यात आणण्यासाठी मविआ सरकारने खूप प्रयत्न केले, अशी अशी उद्धव ठाकरे यांची वेदान्त फॉक्सकॉन प्रकल्पाच्या वादावर प्रतिक्रिया आहे. प्रयत्न वाझेने पण केले होते. बंगला शोधण्याचे? खाली जिलेटिनवाली गाड़ी उभी करण्याचे. तोच वाझे जो लादेन नाही, असे निर्भिड मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं असल्याचं त्यांनी सांगितलं.
पुढे ते असंही म्हणाले की, कोविड काळात मढमध्ये बेकायदा स्टुडिओ बनवणारा अस्लम शेख यांना चालतो. त्याला मदत करण्याची तयारीही असते. दाऊदचा घरगडी नवाब मलिकही चालतो. यांना विरोध करणारे गद्दार ठरतात. आदित्य ठाकरे यांनी गद्दारीची व्याख्याच बदलली असल्याचं म्हणत भातखळकर शिवसेना नेते आदित्य ठाकरेंवरही बरसले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- NCP | “…असं शक्य झालं नाही, तर देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार का?”, राष्ट्रवादीचा खोचक सवाल
- Hero Splendor | हिरो स्प्लेंडर प्लस नवीन रंगात..! काय विशेष आहे ते जाणून घ्या!
- Health Hack | शाकाहारी लोकांनी प्रोटीन कसे आणि कुठून मिळवावे, जाणून घ्या!
- Raj Thackeray | प्रबोधानकार ठाकरेंच्या जयंती निमीत्त राज ठाकरेंनी करुन दिली ‘त्या’ भाषणाची आठवण
- Supriya Sule | “… एवढ्या मोठ्या नाहीत ताई”, सुप्रिया सुळेंच्या ट्विटवर संदीप देशपांडेंचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
