Share

Atul Bhatkhalkar | उद्धव ठाकरे शिवजयंती विसरले अन् अतुल भातखळकर म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी काल नेस्ले सभागृहात शिवसेना गटप्रमुखांना संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. त्यावरून आता भाजप आणि शिंदे गटातील नेते उद्धव ठाकरेंवर पलटवार करत आहेत. उद्धव ठाकरेंनी सभेत शिवजयंती वरुन एक वक्तव्य केलं होतं. मात्र, त्यावेळी ठाकरे कदाचित शिवजयंतीची तारीख विसरल्याने भाजप नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.

अतुल भातखळकर यांचा पलटवारः

अतुल भातखळकर यांनी ट्विट करत १ मे, शिवजयंती जनाब सेनेच्या कॅलेंडरप्रमाणे नवीन कालगणना, असं म्हटलं आहे. एवढंच नाही तर एका मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर केलेल्या टीकेवर देखील भातखळकरांनी पलटवार केला आहे. उध्दव ठाकरे यांनी मा. गृहमंत्री अमित शहा यांना आव्हान देण्याची भाषा करू नये, त्यांच्यासाठी मुंबईचे भाजपा कार्यकर्ते पुरेसे आहेत, असं भातखळकर यावेळी म्हणाले.

पाहा ट्विटः

नितेश राणेंची टीकाः

उद्धव ठाकरेंवर टीका करत असताना भाजप नेते नितेश राणेंनी नालायक हा उल्लेख केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गट संतापण्याची शक्यता आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक कालच्या सभेतील एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचत मोठे झालेले शिवसैनिक आहोत, आम्हाला जमीन दाखवण्याचा प्रयत्न कराच, तुम्हाला आसमान दाखविल्या शिवाय राहणार नाही, असं कॅप्शन त्यांनी लिहिलं आहे. मात्र, महाराजांचा इतिहास शिकत मोठे झालेल्या ठाकरेंना शिव जयंतीची तारीख लक्षात नसल्याने अनेक जण टीका करत आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!